पंडित नेहरुंच्या स्मारकाला १ दिवस ईडीचे अधिकारी नोटीस देतील, संजय राऊतांचा खोचक टोला

मला आता अशी चिंता वाटत आहे की, नॅशनल हेराल्ड प्रकरणी आता पंडित जवाहरलाल नेहरुंना नोटीस पाटवायची बाकी आहे. एक दिवस पंडित नेहरुंचे जे दिल्लीतील स्मारक आहे. त्या स्मारकावर ईडीची नोटीस लावली असेल असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली आहे. ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यावरुन काँग्रेसच्या नेत्यांकडून टीकास्त्र डागण्यात येत आहे. आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनीसुद्धा प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारवर आणी ईडीला टोला लगावला आहे. ईडी एक दिवस दिल्लीतील पंडित नेहरुंच्या स्मारकाला नोटीस लावेल असं मिश्किल वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना नॅशनल हेराल्ड प्रकरणावरुन प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, या देशात कोणालाही ईडी आणि सीबीआयचा समन्स जाऊ शकतो, मंत्री, खासदार, आमदार किंवा नेता असेल त्यांना ईडी जेलमध्ये टाकेल. ब्रिटिशांविरोधात आपला आवाज असला पाहिजे यासाठी पंडित जवाहरलाल नेहरु यांनी नॅशनल हेराल्ड ही संस्था केली होती. आता त्याच्याविरोधात नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत. मला आता अशी चिंता वाटत आहे की, नॅशनल हेराल्ड प्रकरणी आता पंडित जवाहरलाल नेहरुंना नोटीस पाटवायची बाकी आहे. एक दिवस पंडित नेहरुंचे जे दिल्लीतील स्मारक आहे. त्या स्मारकावर ईडीची नोटीस लावली असेल. या सगळ्या गोष्टीसाठी देशाला तयारी करावी लागेल. हे दिवस बदलतील हे दिवससुद्धा जातील असे संजय राऊत म्हणाले.

काय आहे प्रकरण

नॅशनल हेराल्ड पंडित जवाहरलाल नेहरु यांनी स्थापन केलेली संस्था आहे. हे काँग्रेसचे मुखपत्रसुद्धा मानले जायचे. परंतु कालांतराने नॅशनल हेराल्ड बंद पडले. नॅशनल हेराल्ड हा पेपर सध्या बंद पडला आहे. या बंद पडलेल्या पेपरच्या लखनऊ आणि दिल्ली येथील मालमत्ता कथितरित्या हडपण्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर आहे. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. नॅशनल हेराल्डच्या स्थावर मालमत्तांवर काँग्रेसची नजर होती. या पेपरच्या मालमत्ता हडपण्यासाठी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी यंग इंडिया लिमिटेड कंपनीमार्फत घोटाळा केला असा आरोप करण्यात आला आहे.


हेही वाचा : सौरव गांगुली यांचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा?, ट्टिटरद्वारे नव्या कारकिर्दीचे संकेत