घरताज्या घडामोडीराज्यपालांचे घटनेचं पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल, संजय राऊत यांचा...

राज्यपालांचे घटनेचं पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल, संजय राऊत यांचा टोला

Subscribe

विधानसभेचे अस्थित्व आणि घटनेनं दिलेले अधिकार जर एखाद्या राज्याचे राज्यपाल मानत नसतील तर त्याच्यासंदर्भात सरकार काय करतंय ते पाहायला लागेल.

राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी राजकीय मंडळींचे दौरे सुरु आहेत. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही दरडग्रस्त तळीये आणि पूरग्रस्त भागाचा दौरा केला यावेळी राज्यपालांसोबत भाजप आमदार आशिष शेलार होते यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपालांचे घटनेचं पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी निलंबन केलेल्या आमदारासोबत राज्यपाल दौरा करत आहे याचा अर्थ राज्यपाल घटना मानत नाहीत असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यपाल हे नेहमी घटनेचं पुस्तक चाळून काम करत असतात. या पुरामध्ये राज्यपालांचे घटनेचं पुस्तक वाहून गेलंय का ते मला पाहावं लागेल. १२ आमदारांचे निलंबन घटनेनुसार झालं आहे. विधीमंडळात भाजप आमदारांनी गदारोळ केला, दंगा घातला, राजदंडाला हात घातला हे वर्तन घटनाबाह्य असल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी काही आमदारांचे निलंबन केलं आहे. राज्यपाल या आमदारांना घेऊन पाहणी दौरा करत आहेत. यामुळे असे दिसत आहे की, राज्यपाल विधानसभेचं अधिकार मानायला तयार नाहीत, विधानसभेचे अस्थित्व आणि घटनेनं दिलेले अधिकार जर एखाद्या राज्याचे राज्यपाल मानत नसतील तर त्याच्यासंदर्भात सरकार काय करतंय ते पाहायला लागेल. राज्यपालांना जास्त समजते असे मी मानतो, अर्थात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार म्हणालेत जर राज्यपाल गेले आहेत निलंबित आमदारांना घेऊन तर नक्कीच राज्यपाल जास्तीत जास्त मदत केंद्र सरकारकडून आणतील अशी आपेक्षा करतो. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

- Advertisement -

राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार राज्यपालांचा दौरा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांच्या दौऱ्यावरुन प्रश्न केला असता त्यांनी म्हटलंय की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका कार्यक्रमासाठई गेलो होतो. यावेळी राज्यापाल यांनी चर्चेदरम्यान सांगितं आहे की, राष्ट्रपतींनी सुचना केली आहे की पूरग्रस्त भागाची पाहणी केली पाहिजे. या नुसार राज्यातील ४ पक्षांच्या प्रमुखांना माझ्यासोबत बोलवलं असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपकडून आशिष शेलार गेले आहेत. राज्यपालांचा दौरा राजकीय होऊ नये यासाठी सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहावे यासाठी प्रतिनिधी बोलवण्यात आले होते. परंतू बाकीच्या पक्षांचे नेते का उपस्थित राहिले नाही याची कल्पना नाही असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -