देशातील वातावरण पाहून इंग्रजांची राजवट बरी होती, संजय रांऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

sanjay raut slams modi government Seeing the atmosphere in the country British rule was good
देशातील वातावरण पाहून इंग्रजांची राजवट बरी होती, संजय रांऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

देशातील वातवारण पाहून इंग्रजांची राजवट बरी होती असे म्हणण्याची वेळ आली आहे. असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला आहे. खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या भेटीनंतर जेलमधले अनुभव जाणून घेतल्यानंतर इंग्रजांच्या जेलची आठवण झाली अशी टीका माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. यानंतर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. किंबहूना ज्या प्रकारची राजवट सध्या देशात सुरु आहे. ते पाहिल्यावर असं वाटतं की इंग्रज बरे होते असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यातील जेलची तुलना इंग्रजांच्या जेलशी केली आहे. असे संजय राऊत यांना सांगितले यावर राऊतांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

उचलली जीभ लावली टाळ्याला – राऊत

जनाब उल्लेख केल्यामुळे मला वाईट वाटण्याचे कारण नाही. कोण बोलतंय त्या बोलणाऱ्याची भूमिका काय आहे? त्याचे राजकारण आणि समाजकारणातील स्थान काय आहे? पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे करु नये. आपला पूर्व इतिहास तपासून तुम्ही राजकारणात बोलावे अशा शब्दात संजय राऊत यांनी गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला आहे.

त्या मैदानावर शिवसेनेने इतिहास रचला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा औरंगाबादमध्ये होणार आहे. ज्या मैदानावर १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली त्या मैदानावर ८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. यावरुन राऊतांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्या मैदानावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सभा घेतल्या आहेत. शिवसेनेने इतिहास रचला आहे. मैदान गर्दीने ओसंडून गेले होते. राज ठाकरेंची सभा झाली म्हणून उद्धव ठाकरेंची सभा होणार यात काही अर्थ नाही असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : Monsoon News : दिलासाजनक! यंदा मान्सूनचे 10 दिवस आधीच आगमन: मुंबई, कोकणात कधी होणार सुरूवात?