Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ठाकरे सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक संवेदनशील, संजय राऊत यांचे वक्तव्य

ठाकरे सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक संवेदनशील, संजय राऊत यांचे वक्तव्य

महिलांच्या सुरक्षेत कोणतीही हयगय केली जाणार नाही हे स्पष्टपणे सांगितले आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील सरकार आणि महाराष्ट्र हा महिलांच्या सुरक्षेबाबत नेहमीच संवेदनशील राहिला आहे. परंतु सध्याचे ठाकरे सरकार हे महिला सुरक्षेच्याबाबत अधिक संवेदनशील आहे. असे वक्तव्य शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. साकीनाका येथील महिलेवर झालेल्या अत्याचारानंतर या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे महिला सुरक्षेवरुन राज्य सरकारवर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असल्याचे विरोधकांनी म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकराने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण द्यावे असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर देशातील जनता कोणाच्या भरोशावर आहे हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट करावं असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना महिला सुरक्षेबाबत सरकार संवेदनशील असल्याचे म्हटलं आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे की, महिलांच्या सुरक्षेबाबत महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य हे कायम संवेदनशील आहे आणि राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या देशातील महिलांना आणि लेकी-सुनांना संरक्षण मिळावे प्रतिष्ठा मिळावी, त्यांच्यावर कोणताही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक कायदे केले, प्रयोग केले विशेषता महाराष्ट्राचे राज्यकर्ते कायम संवेदनशील राहिले आहेत. सध्याचे ठाकरे सरकार हे अधिक संवेदनशील आहे. विरोधी पक्ष आरोप करत असतात पण कालही मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये महिलांच्या सुरक्षेत कोणतीही हयगय केली जाणार नाही हे स्पष्टपणे सांगितले आहे.

पॅगेसस प्रकरणावरुन केंद्रावर टीका

- Advertisement -

पॅगेसस प्रकरणावरुन संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकार काहीतरी लपवत आहे. पेगॅसस प्रकरणामुळे लोकसभा, राज्यसभेचं संपुर्ण सत्र चालु शकले नाही. प्रचंड गोंधळ झाला बेशिस्त वर्तण झालं पण सरकारने लपवाछपवी केली आहे. केंद्र सरकारने न्यायालयाचीही फसगत केली आहे. कोणतीही राष्ट्रीय सुरक्षा पेगॅससच्या माध्यमातून या देशातील पत्रकार, राजकारणी, अधिकारी, सैन्यातील अधिकारी यांच्यावर पाळत ठेवण्यात आली असे आरोप आणि पुरावे आहेत. परंतु सरकार याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यास तयार नाही. यामुळे हा देश आणि देशातील जनता नक्की कोणाच्या भरोशावर आहे हे कळत नाही आहे असा सवार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.


हेही वाचा : तहसीलदार ज्योती देवरेंच्या अडचणीत वाढ, विधिज्ञ असीम सरोदे ACB कडे तक्रार करणार


- Advertisement -

 

- Advertisement -