घरताज्या घडामोडीSanjay Raut : राऊतांनी पंतप्रधान मोदींना दिली नवी उपाधी; म्हणाले, आमच्या कंस...

Sanjay Raut : राऊतांनी पंतप्रधान मोदींना दिली नवी उपाधी; म्हणाले, आमच्या कंस मामाला भीती वाटते

Subscribe

आमच्या कंस मामाला भीती वाटते. आणि त्या कंस मामाला ज्यांची भीती वाटते, त्यांना ते थेट तुरुंगात टाकत आहेत, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासादर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

मुंबई : आमच्या कंस मामाला भीती वाटते. आणि त्या कंस मामाला ज्यांची भीती वाटते, त्यांना ते थेट तुरुंगात टाकत आहेत, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासादर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. 28 मार्चपर्यंत केजरीवालांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. (sanjay raut slams pm narendra modi on arvind kejriwal arrested)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. विशेष म्हणजे टीका करताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना नवी उपाधी सुद्धा दिली आहे. त्यानुसार, कंस मामा म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“कंस मामाला ज्यांची-ज्यांची भीती वाटत होती, त्यांना त्याने तुरुंगात टाकलं होतं. अगदी देवांनाही कंस मामाने तुरुंगात टाकलं होतं. पण त्याच तरुंगात श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि त्याने कंसाचा वध केला. या देशात आता तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आमच्या कंस मामाला (पंतप्रधान नरेंद्र मोदी) भीती वाटते. आणि त्या कंस मामाला ज्यांची भीती वाटते, त्यांना ते थेट तुरुंगात टाकत आहेत”, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

मागील काही दिवसांपासून शिवसेने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे भाजपसह केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. नुकताच इलेक्टोरल बॉण्डवरून सर्वोच्च न्यायालयाने भाजपवर ताशेरे ओडले. याचपार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करत त्यांच्यावर हल्लाबोल केला.

- Advertisement -

हेही वाचा – LOK SABHA : लोकसभा केवळ ट्रेलर, खरा पिक्चर विधानसभेत दिसेल; जानकरांचा महायुतीला इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -