घरताज्या घडामोडी"आगीच्या घटनांवर अश्रू ढाळू नका" काय पावलं उचलणार सांगा, राऊतांचा केंद्रासह राज्य...

“आगीच्या घटनांवर अश्रू ढाळू नका” काय पावलं उचलणार सांगा, राऊतांचा केंद्रासह राज्य सरकारला सवाल

Subscribe

राज्यात दिवाळी साजरी होताना अहमदनगरमधील रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे आनंद होरपळून खाक झाला आहे. रुग्णालयातील आयसीयूमध्ये लागलेल्या आगीमध्ये ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवरुन राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले परंतु याचे राजकारण न करता याबाबत काय पावलं उचलणार ते सांगा असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला करत चांगलेच फटकारले आहे. ही होरपळ थांबायला हवी. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे ही परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी काय करणार ते सांगा असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून आरोग्य व्यवस्थेवरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकारला चांगलेच फटकारले आहे. राज्यात मागील काही महिन्यांपासून अनेकवेळा सार्वजनिक रुग्णालयांत आगीच्या घटना घडल्या असून यामध्ये रुग्ण दगावले आहेत. नुकत्याच नगरमधील रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या रुग्णालयाच्या फायर ऑडीटवर प्रश्न उपस्थित होत असताना सर्वच आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

स्वतःला महासत्ता म्हणवून घेणाऱ्या देशात रुग्णांची आणि मृतांची ससेहोलपट होताना दिसत आहे. हे चित्र शोभत नाही. कोरोना काळात देशातील आरोग्य व्यवस्था कशी गोलमाल आहे हे समोर आलं आहे. जगात आरोग्य व्यवस्थेवर सर्वात कमी खर्च करणारा देश म्हणून भारताच्या बाबतीत बोललं जाते. देशात आजही दुर्गम भागात आरोग्य व्यवस्था पोहचत नाही. तेथील रुग्णांना पाठीवर उचलून किंवा झोळीतून रुग्णालयात नेले जाते. देशात बिहार, ओडिशासारख्या राज्यातही आरोग्य व्यवस्था कोसळली आहे. महाराष्ट्रात घडणाऱ्या आगीच्या घटनांवर आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत हे देखील खरं आहे. धड उपचार मिळत नसल्यामुळे रुग्ण प्राण गमवतात असे संजय राऊत म्हणाले.

देशातील आणि राज्यातील अनेक सार्वजनिक सरकारी रुग्णालयांत डॉक्टर, एक्सरेची मशीन आणि तसेच तज्ञ डॉक्टर्स नसतात. आपल्याकडे चांगली रुग्णालये नाहीत. तसेच आरोग्य व्यवस्थेवर खर्चही दोन ते तीन टक्के करण्यात येत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेचेही खासगीकरण व्हावे या मताचे आपलं सरकार आहे. परंतु सर्वसामान्य जनतेला ते परवडणारं नाही. यामुळे रुग्णालयांतील आगीच्या घटना थांबल्या पाहिजेत. यासाठी काय ठोस निर्णय करणार आणि काय पावलं उचलणार ते फक्त सांगा असा सवाल संजय राऊतांनी केंद्र आणि राज्य सरकारला केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची तोडफोड; कार्यकर्तेही जखमी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -