Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाही तर ते म्हणतील आम्ही त्यांचे वकील आहोत की काय; राऊतांचा पुन्हा...

नाही तर ते म्हणतील आम्ही त्यांचे वकील आहोत की काय; राऊतांचा पुन्हा पवारांना टोला

Subscribe

 

मुंबईः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सद्या शाब्दिक चकमक सुरु आहे. त्यात आता पुन्हा संजय राऊत यांनी पवारांना टोला लगावला आहे. उद्या बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार हे उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. नंतर ते अन्य नेत्यांना भेटतील. पण त्यांनी कन्फर्म करायला हवं. नाही तर ते म्हणतील आम्ही त्यांचे वकील आहोत की काय, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले, उद्या बिहाराचे मुख्यमंत्री नितिश कुमार मुंबईत येणार आहेत. ते दुपारी १ वाजता उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यानंतर ते अन्य नेत्यांना भेटतील. पण त्यांनी त्यांची वेळ कन्फर्म करायला हवी. नाही तर ते म्हणतील की आम्ही त्यांचे वकील आहोत की काय.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर अनेक तर्कविर्तक लढवले गेले. कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला. त्यानंतर दैनिक सामनामध्ये अग्रलेख छापून आला. शरद पवार हे नेतृत्त्व घडवण्यात अपयशी ठरेल, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली होती. त्याला शरद पवार यांनीही चोख उत्तर दिले. त्यांना लिहिण्याचा अधिकार आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आम्ही कोणला संधी दिली आणि कोणाला नाही हे सर्वश्रुत आहे, असा टोला शरद पवार यांनी हाणला.

- Advertisement -

याआधीही संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये जुंपली होती. भाजप फोडाफोडीचे राजकारण करत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधला एक गट फुटून भाजपसोबत जाणार आहे, असे वक्तव्य दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आले होते. त्यावर अजित पवार संतापले होते. तुम्ही तुमच्या पक्षाविषयी बोला. आमच्यात लुडबुड करण्याची गरज नाही, असे अजित पवार यांनी संजय राऊत यांना सुनावले होते. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मी फक्त शरद पवार यांचंच ऐकतो. मी बोलतच राहणार, असे राऊत यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर अजित पवार यांनी कोण संजय राऊत, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींना केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांंनी या वादाला पूर्ण दिला. अजित पवार हे गोड माणूस आहेत. आम्ही सर्व त्यांच्यावर प्रेम करतो, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.

- Advertisment -