घरताज्या घडामोडीएकनाथ शिंदे भाजपचे मुख्यमंत्री, विचारांचं आदान-प्रदान मध्यरात्री करतात; संजय राऊतांचा घणाघात

एकनाथ शिंदे भाजपचे मुख्यमंत्री, विचारांचं आदान-प्रदान मध्यरात्री करतात; संजय राऊतांचा घणाघात

Subscribe

एकनाथ शिंदे यांच्या दाव्याचा संजय राऊत यांनी उघडपणे इन्कार केलाय. एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री असून कॅबिनेट ठरवण्यासाठी त्यांना दिल्लीत जावं लागतं, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन तृतीयांश आमदार असल्याने त्यांनी शिवसेनेवर दावा केला आहे. राज्यात शिवसेना-भाजपची (Shivsena BJP Alliance) सत्ता असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या दाव्याचा संजय राऊत यांनी उघडपणे इन्कार केलाय. एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री असून कॅबिनेट ठरवण्यासाठी त्यांना दिल्लीत जावं लागतं, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Sanjay Raut slapped to CM Eknath Shinde)

हेही वाचा – शिवसेना आता कदापी उभी राहणार नाही, नारायण राणेंची बोचरी टीका

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचं हायकमांड दिल्लीत आहे. दिल्लीतील आदेशावर मुख्यमंत्र्यांची भूमिका ठरते. शिवसेनेचा मुख्यमंत्री मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी कधी दिल्लीत गेला नाही. शिवसेनेचं हायकमांड मुंबईत आहे, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

सीमाभागात मराठी माणसांवर अत्याचार

- Advertisement -

महाराष्ट्रातून शिवसेनेची सत्ता गेल्यापासून कर्नाटकात सीमाभागात मराठी माणसावर अत्याचार वाढला आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सीमाभागातील शिष्टमंडळ आज माझ्या भेटीला आले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक मागणी करावी. कर्नाटक सीमाभागाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाचा निकाल येत नाही तोवर हे राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा – शिवसेना कात टाकणार? उपनेतेपदी अर्जुन खोतकरांची नियुक्ती; दोघांची हकालपट्टी

मध्यरांत्री विचारांचं आदान-प्रदान केलं जातं

देवेंद्र फडणवीस रात्री वेष बदलून एकनाथ शिंदेंना भेटायला जायचे असा गौप्यस्फोट अमृता फडणवीस यांनी केला होता. तसेच, एकनाथ शिंदेंनीही रात्रीच्या भेटीबाबत विधानसभेत सांगितलं होतं. दरम्यान, काल रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात बैठक झाली. रात्री अडीच वाजता यांच्यात बैठक संपली. यावरून संजय राऊतांनी टोला लगावला. सध्या मध्यरात्रीच विचारांचं आदान-प्रदान केलं जातं, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा – शिंदे -फडणवीस यांची दिल्लीत अमित शहांसोबत मध्यरात्री खलबतं!

मुंबईचा उद्योग महाराष्ट्राबाहेर घेऊन जाणार

केंद्रीय नेतृत्त्वाने एकनाथ शिंदेंना वचन दिलंय की त्यांना हवं ते मिळणार. त्याबदल्यात एकनाथ शिंदे त्यांना काय देणार? असा सवाल संजय राऊतांनी विचारला. ते म्हणाले की त्याबदल्यात महाराष्ट्राचे तीन तुकडे होणार. मुंबई स्वतंत्र होणार. मुंबईतील उद्योग, कार्यालये महाराष्ट्राबाहेर नेणार. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी याकडे लक्ष द्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -