घरताज्या घडामोडी१०० आमदार, २५ खासदार निवडून आणण्याची ताकद धनुष्यबाणामध्ये, राऊतांनी नाशिकमध्ये डागली तोफ

१०० आमदार, २५ खासदार निवडून आणण्याची ताकद धनुष्यबाणामध्ये, राऊतांनी नाशिकमध्ये डागली तोफ

Subscribe

संजय राऊत नाशिकमध्ये बोलत होते. आज नाशिकमध्ये मेळावा आयोजित केला. या मेळाव्यादरम्यान तुफान पाऊस होता. मात्र, पावसातही राऊतांचं भाषण तुफान गाजलं. तसेच, शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी गर्जना करून परिसर दणाणून सोडला. 

शिवसेनेचे ४० आमदार शिंदे गटात जाऊन सामिल झाले आहेत. त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. तसेच, अनेक नगरसेवकही शिंदे गटात गेलेत. अनेक खासदारही शिंदे गटात जाण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या बंडखोर आमदारावंर टीका केली आहे. १०० आमदार, २५ खासदार निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणामध्ये आहे, असं म्हणत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना टीकास्त्र सोडलं. संजय राऊत नाशिकमध्ये बोलत होते. आज नाशिकमध्ये मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यादरम्यान तुफान पाऊस पडला. मात्र, पावसातही राऊतांचं भाषण सुरू होतं. तसेच, शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी गर्जना करून परिसर दणाणून सोडला.  (Sanjay raut speech in nashik melava regarding rebel mla and eknath shinde)

हेही वाचा – एकनाथ शिंदे भाजपचे मुख्यमंत्री, विचारांचं आदान-प्रदान मध्यरात्री करतात; संजय राऊतांचा घणाघात

- Advertisement -

४० आमदार म्हणजे शिवसेना नाही, २-५ खासदार इकडे तिकडे गेले म्हणजे शिवसेना हलली असं होत नाही. १०० आमदार, २५ खासदार निवडणून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणामध्ये आहे, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी ‘आमचा धनुष्यबाण’ हे शब्द अधोरेखित केले. तसेच, शिवसेना आमच्याच बापाची आहे. पन्नास खोके देऊन आमची शिवसेना विकली जाणार नाही, असंही ठणकावून सांगितले.

गुलाबरावांचा जुलाबराव होईल

- Advertisement -

बंडखोर आमदारांना पन्नास खोके पचणार नाहीत. गुलाबरावांचा जुलाबराव होईल. त्यांना पचणार नाही. थोड्याच दिवसांनी सगळ्यांना जुलाब होईल. बेईमानी करणं हे सोपं काम नाही. इथे असली नकली असं काही नाही. जे काही आहे तीच शिवसेना असली आहे. नाशिकमध्ये हनुमानाचं जन्मस्थान असल्याचं स्पष्ट झालंय. म्हणजे, हनुमान आमचा, गदा आमची, शिवसेना आमचीच, जन्माला कोणी घातली शिवसेना, बाळासाहेबांनी घातली, तोच आमचा बाप, अशा शब्दात संजय राऊत यांनी घणाघात केला.

हेही वाचा शिवसेना आता कदापी उभी राहणार नाही, नारायण राणेंची बोचरी टीका

मानसिक गोंधळ करू नका, नक्की काय ते ठरवा

बंडखोर आमदारांनी आम्ही हिंदुत्त्वासाठी बाहेर पडलो असं पहिल्या दिवशी सांगितलं. दुसऱ्या दिवशी सांगितलं आम्हाला राष्ट्रावादीचे लोक निधी देत नाहीत, म्हणून बाहेर पडलो. तिसऱ्या दिवशी सांगितलं आम्हाला उद्धव ठाकरे भेटीला वेळ देत नाहीत, म्हणून बाहेर पडलो. चौथ्या दिवशी सांगितलं आदित्य ठाकरे जास्त ढवळाढवळ करतात म्हणून बाहेर पडलो. पाचव्या दिवशी सांगितलं विठ्ठलाभोवती बडवे जास्त झाले म्हणून बाहेर पडलो. सहाव्या दिवशी सांगितलं संजय राऊतांमुळे बाहेर पडलो. सातव्या दिवशी सांगितलं शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे म्हणून बाहेर पडलो. मी म्हणतो एकदाच काय ते बसा आणि ठरवा नक्की कशासाठी बाहेर पडलात. मानसिक गोंधळ करून घेऊ नका, असं राऊतांनी बंडखोर आमदारांवर शाब्दिक बाण मारले.

उद्धव ठाकरे आजारी असताना पाठित खंजीर खुपसला

शिवसेनेने या लोकांना आमदार केलं. मंत्री केलं. मान सन्मान दिला. पण यांनी एका रात्रीतच उद्धव ठाकरेंच्या पाठित खंजीर खुपसला. गेले चार महिने उद्धव ठाकरे आजारी होते. या आजारपणाचाच गैरफायदा घेऊन बंडखोर पळून गेले, असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोना फैलावला होता तेव्हा उद्धव ठाकरे कुटुंब प्रमुखाप्रमाणे राज्य सावरत होते. या काळात गोदावरीमध्ये प्रेतं वाहिली नाहीत. कुटुंबांचे जीव वाचवले. तरी म्हणतात की उद्धव ठाकरे भेटत नाहीत.

धनुष्यबाण आमचा पंचप्राण

बंडखोर आमदार आता म्हणतात आमची शिवसेना खरी, आमचा धनुष्यबाण. पण धनुष्यबाण आमचा पंचप्राण आहे, आधी हृदयातील प्राण जाईल मग धनुष्यबाण जाईल, हे पंचप्राण दोन-पाच खोक्यांनी विकले जाणारे नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचाच आवाज राहिल. हा अंगार महाराष्ट्रात पेटला तर विझणार नाही आणि बुडाला आग लागल्याशिवाय राहणार नाही, असाही घणाघात यावेळी संजय राऊतांनी केला आहे.


लाल किल्ल्याला नाही रायगडाला सलाम करतो

लाल किल्ल्याला आम्ही सलाम नाही मारत, आम्ही रायगडाला सलाम मारतो, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीला गेले आणि म्हणे आम्ही शिवसैनिक.
महाराष्ट्राचं हायकमांड मातोश्री, मराठी माणसाचं हायकमांड मातोश्री आहे, असंही राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, दिल्लीने नेहमी महाराष्ट्रावर अन्याय केला, महाराष्ट्र मिळवण्यासाठी दिल्लीने अन्याय केला, दिल्लीवाल्यांना मराठी माणसापासून मुंबई तोडायची आहे, पण शिवसेना असं होऊ देणार नाही.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -