घरमहाराष्ट्रउठ मराठ्या उठ! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

उठ मराठ्या उठ! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

Subscribe

 बेळगावात झालेल्या हल्ल्यावर संजय राऊतांनी केंद्रावर निशाणा ठेवला आहे. मराठी माणसाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याकरता भाजपा सरकारने बेळगावात हल्ला केला असल्याचा आरोप त्यांनी भाजपाचा नामोल्लेख न करता केला आहे.

मुंबई – महाराष्ट्रातून येणार्‍या नेत्यांची अडवणूक करू नका, या मागणीचे निवेदन घेऊन बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपवण्याचा खेळ सुरू झालाय, अशी टीका करत संजय राऊतांनी मराठ्यांना उठ मराठ्या उठ अशी साद घातली आहे.

संजय राऊत यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मराठ्यांना साद घातली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात की, दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे. उठ मराठ्या उठ!

- Advertisement -


महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक झाल्याने हे प्रकरणाबाबत आपण गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी चर्चा करणार आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी हे प्रकरण केंद्राच्याच मदतीने होत असल्याचा आरोप केला आहे. बेळगावात झालेल्या हल्ल्यावर संजय राऊतांनी केंद्रावर निशाणा ठेवला आहे. मराठी माणसाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याकरता भाजपा सरकारने बेळगावात हल्ला केला असल्याचा आरोप त्यांनी भाजपाचा नामोल्लेख न करता केला आहे.

तसंच, संजय राऊत पुढे म्हणाले, ‘मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे. महाराष्ट्र इतका लेचा-पेचा कधीच झाला नव्हता. तीन महिन्यांत महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले. स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढपणा आहे.’

- Advertisement -


वाहनांवर हल्ला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावचा दौरा रद्द केल्याचे शिंदे सरकारकडून सांगण्यात आले. असे असूनही मंगळवारी दुपारी बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्रातून बंगळुरूच्या दिशेने जाणार्‍या ६ वाहनांवर दगडफेक करण्यात आली. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हा हल्ला केला. या घटनेचे राज्यात तीव्र प्रतिसाद उमटले.

बससेवा खंडीत

कायदा आणि सुव्यस्था लक्षात घेता महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी सेवा तात्पुरत्या खंडीत करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, कर्नाटकात जाणाऱ्या येणाऱ्या १४५ एसटी फेऱ्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. तसंच, पोलिसांच्या सूचनेनुसार या फेऱ्या आजही रद्द राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. याचा परिणाम ६६० बस फेऱ्यांवर होणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -