शंभर टक्के गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार, संजय राऊतांचा विश्वास

भाजपाने उत्पल पर्रिकरांचा केलेला अपमान गोव्याची जनता विसरणार नाही - संजय राऊत
Goa Election 2022 Sanjay Raut slams bjp criticise utpal parrikar resigns from BJP

गोव्यात भारतीय जनता पक्ष सरकारमधले मायकल लोबो यांनी पक्षाचा त्याग केला. दुसरीकडे त्यांच्या प्रमुख आमदारांनी सुद्धा भाजपला सोडलं आहे. गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपा अभेद्य नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या अनेक आमदारांनी समाजवादी पार्टीमध्ये गेल्या काही दिवसांमध्येच प्रवेश केलेला आहे. हवामानाचा अंदाज आल्यामुळे वारे फिरत आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानुसार शंभर टक्के गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार, असल्याचा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दाखवला आहे.

भारतीय जनता पक्षाने सावधगिरी बाळगावी

खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊत म्हणाले की, कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी देखील आज मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे, असा प्रश्न पत्रकारांनी राऊतांना विचारला असता. ते म्हणाले की, मौर्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. परंतु असं देखील म्हटलं जातं की, त्यांना हवेचा अंदाज पटकन येतो. ते मौर्य असल्यामुळे त्यांना अंदाज पहिला येतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने सावधगिरी बाळगावी, असं राऊत म्हणाले.

शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार का?

काल आम्ही राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. ही बैठक गोव्या संदर्भात होती. त्याप्रमाणे आम्ही तयारीला लागलो आहोत. या बैठकीला मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर, अनिल देसाई, विनायक राऊत, वैभव नाईक, संदेश पारकर, सुनील शिंदे आणि सुनिल प्रभू अशा प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती. हे सर्व लोकं गोव्यात जाऊन निवडणुकीचं नेतृत्त्व करणार आहेत. आम्ही काम करत आहोत आणि करत राहू, असं संजय राऊत म्हणाले.

उद्या मी दिल्लीला रवाना होणार आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जाणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष म्हणून काही करायचं आहे. ते आम्ही करत राहणार आहोत. तसेच युपीमध्ये आम्ही ५० किंवा त्यापेक्षाही जास्त जागा लढणार आहोत.

गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार

भाजपा समाज माध्यमांतून आणि ओपिनियन पोलच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचं कार्य करत आहेत. त्यामुळे त्या अफवांवर विश्वास ठेवू नका. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानुसार शंभर टक्के गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.


हेही वाचा : Assembly Election 2022 : यूपीमध्ये भाजपला मोठा धक्का, कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्यांचा सपामध्ये प्रवेश