घरताज्या घडामोडीगेल्या ३० वर्षांपासून शिवसेना आणि अयोध्येचं एक वेगळं नातं - खासदार संजय...

गेल्या ३० वर्षांपासून शिवसेना आणि अयोध्येचं एक वेगळं नातं – खासदार संजय राऊत

Subscribe

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात शिवसेना भवनात शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. बैठक संपल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नसून ती आमची पायवाट आहे. गेल्या ३० वर्षांत शिवसेना आणि अयोध्या यांच्यात एक वेगळंचं नातं निर्माण झालंय. त्यामुळे आम्हाला काही फार तयारी करावी लागणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

प्रत्येक शिवसैनिक आणि शिवसेनेचा पदाधिकारी हा सतत अयोध्येला जाऊन येत असतो. मी स्वत: जाऊन येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मुख्यमंत्री नसताना आणि असताना देखील अयोध्येला जाऊन आले आहेत. आदित्य ठाकरे सुद्धा अनेकदा अयोध्येला जाऊन आले आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आणि त्यावर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे आम्हाला अयोध्येला जाता आलं नाही. नाहीतर आमचा जाण्याचा कार्यक्रम हा तेव्हापासूनच ठरला होता. त्यामुळे त्यासंदर्भात आमच्या बैठका सुरू आहेत. या चार ते पाच दिवसात तारीख ठरवू, असं संजय राऊत म्हणाले.

आदित्य ठाकरेंचा दौरा हा पिकनिक दौरा असल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे असा प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, कोण काय बोलतंय. त्याच्यावर आमचे दौरे ठरत नाहीत. अयोध्येच्या आंदोलनामध्ये अनेक शिवसैनिक होते. अयोध्येच्या आंदोलनात शिवसेनेचं बलिदान झालेलं आहे. अशा प्रकारचं जर कोणी वक्तव्य करत असेल तर तो त्या आंदोलनाचा अपमान आहे. तसेच त्या बलिदानाचा अपमान आहे. ५० वर्ष शिवसेना वादळांसोबत संघर्ष करत इथपर्यंत पोहोचली आहे. आम्हाला वादळं नवीन नाहीत. वादळं परतवून लावण्याची आणि निर्माण करण्याची क्षमता आणि ताकद महाराष्ट्राच्या शिवसेनेमध्ये आहे, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Live Update : सानपाड्यात होणाऱ्या मशिदीला स्थानिकांचा विरोध; मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली राज ठाकरेंची भेट


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -