घरताज्या घडामोडीआमचा पाठिंबा एका आदिवासी महिलेला, शिवसेना संभ्रमात नाही; संजय राऊतांचं स्पष्टीकरण

आमचा पाठिंबा एका आदिवासी महिलेला, शिवसेना संभ्रमात नाही; संजय राऊतांचं स्पष्टीकरण

Subscribe

या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आदिवासी समाजाचं मोठं योगदान आहे. अनेक शेकडो आदिवासी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले आहेत. त्यांचा संघर्ष फार मोठा आहे. ब्रिटीशांच्या काळात डोंगर, दरी आणि खोऱ्यांमध्ये ज्या आदिवासींनी लढे दिलेले आहेत. त्यांचं नेतृत्व द्रौपदी मुर्मू करत आहेत. राज्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहेत. आमचे आमदार, खासदार, कार्यकर्ते हे आदिवासी समाजाचे आहेत. प्रथमच ज्या समाजाला इतक्या मोठ्या सर्वोच्च पदावर जायला संधी मिळतेय. त्यांना आपण पाठिंबा द्यायला पाहीजे. त्यामुळे पक्षप्रमुखांनी पाठिंबा जाहीर केला. आमचा पाठिंबा एका आदिवासी महिलेला आहे, असं स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलं आहे.

शिवसेना संभ्रमात आहे का?

- Advertisement -

संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिवसेना संभ्रमात नाही. कारण आम्ही एनडीएमध्ये असताना प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काहीही आश्चर्य वाटण्याचं आणि संभ्रमित व्हायचं कारण नाही. या देशामधल्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. आमचा पाठिंबा एका आदिवासी महिलेला आहे, असं राऊत म्हणाले.

देशातलं स्थान हे येणारा काळ ठरवेल

- Advertisement -

महाविकास आघाडीचं अस्तित्व आता संपलेलं आहे, असं भाजप नेते आशिष शेलार म्हणाले होते, असा प्रश्न पत्रकरांनी विचारला असता, राऊत म्हणाले की, हे येणारा काळ ठरवेल. शिवसेना आणि महाविकास आघाडीची ताकद, त्यांचं देशातलं स्थान हे येणारा काळ ठरवेल. हे कुणी एखाद दुसरा नेता ठरवू शकत नाही. राज्याची जनता ठरवेल. आज जे काही बुडबुडे फुटत आहेत. ते फार काळ राहणार नाही. माझ्यासह सर्वांना माहितीये. हे भाजपच्या नेत्यांनाही माहितीये. तसं असतं तर १५ दिवसानंतर सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार जो टाळला जातोय, तो टाळण्यात आला नसता.

आम्हाला न्यायाची अपेक्षा

आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. जो कायदा, न्याय आणि नियम आहे. त्यावरच आम्ही भरोसा ठेऊन आहोत. आजही सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळालेला नाही, हे रामशास्त्र आहे. याचं प्रत्यंत्तर भविष्यात आल्याशिवाय राहणार नाही.

…अशी चेष्ठा कधीही लोकशाहीची झाली नव्हती

२ जणांचं मंत्रिमंडळ १५ दिवस सुरू आहे. जगामध्ये अशी चेष्ठा कधीही लोकशाहीची झाली नव्हती. इतका मोठा भाजपचा गट असून १५ दिवसानंतर सुद्धा मंत्रिमंडळ आतापर्यंत स्थापन का झालं नाही, भविष्यात मंत्रिमंडळ स्थापन होण्याची शक्यता मला कमी दिसत आहे.


हेही वाचा : पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत राणे बंधूंचा ठाकरेंना सावधानतेचा इशारा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -