घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राप्रमाणे गोवा राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यास काँग्रेस पक्ष अनुत्सुक - संजय...

महाराष्ट्राप्रमाणे गोवा राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यास काँग्रेस पक्ष अनुत्सुक – संजय राऊत

Subscribe

महाराष्ट्राप्रमाणे शेजारच्या गोवा राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यास काँग्रेस पक्ष उत्सुक नसल्याची माहिती समोर आली असून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी त्याला दुजोरा दिला.

गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग कायम रहावा यासाठी राज्यातील आघाडी सरकार गोव्यात एकत्रित विधानसभा निवडणूका लढविण्याबाबत उत्सुक होते. मात्र आता गोव्यात स्वबळावर सत्ता आणता येईल असे काँग्रेसला वाटत असल्याने कदाचित ते महाविकास आघाडीच्या प्रयोगाला तयार नसावेत, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी स्पष्ट केले.

- Advertisement -

पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार गोव्यातही एकत्रित निवडूक लढवणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यातील विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार असले तरी काँग्रेस मात्र त्यांच्यासोबत नसल्याचे स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज माध्यमांसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आमच्यासोबत…

गोव्यामध्ये आपण स्वबळावर सत्ता आणू शकतो, असे काँग्रेसला वाटत असल्याने कदाचित ते महाविकास आघाडीच्या प्रयोगाला तयार नसावेत. काँग्रेसने आम्हाला काही जागा दिल्या आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आमच्यासोबत आहे. त्यामुळे या प्रकरणात आम्ही आणखी प्रयत्न करत आहोत. परंतु शिवसेना ही निवडणूक लढवणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

- Advertisement -

भाजपचा टोला

दरम्यान, उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेनेने दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांच्या अनामत रक्कम जप्त करण्यासाठी शिवसेनेला पैसे मिळतात. याच कारणामुळे शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशात निवडणूक लढवत असल्याचा सणसणीत टोला पाटील यांनी लागवला आहे.


हेही वाचा : Novak Djokovic : न्यायालयीन लढाई जिंकत नोवाक जोकोविच दिसला टेनिस कोर्टात, न्यायाधीशांचे आभार, म्हणाला…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -