अत्तराचेही राजकारण आपल्या देशात होऊ शकतं, खासदार संजय राऊतांचा टोला

Goa Assembly Election 2022 sanjay raut says goa elections steering of maha aaghadi govt hand of uddhav thackeray

राजकारणात आजकाल सगळेच बडे नेते महागडं अत्तर स्वत:च्या घरी ठेवतात. परंतु दुसऱ्याच्या घरात सापडलं तर ही मोठी गोष्ट असते. लखनऊ, कन्नौज, कानपूर १८० कोटीचं पेपर परफ्युम मिळालं आहे. यावर आता राजकीय खेळीला सुरूवात झाली आहे. गोव्यात काय चाललंय?, यूपी आणि पंजाबमध्ये काय होईल. याच महागड्या अत्तराचा वापर करून हे लोकं निवडणूक लढणार आहेत. तसेच जिंकणारही आहेत.अत्तराचेही राजकारण आपल्या देशात होऊ शकतं, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अत्तराचेही राजकारण आपल्या देशात होऊ शकतं. इतका आपला देश सांस्कृतिकदृष्ट्या महान झालेला आहे. उत्तर प्रदेशच्या एका अत्तर व्यापाराकडे १८० कोटींच्या अत्तराचं घबाड मिळालं आहे. त्याच्यामुळे या देशात प्रत्येकाला वाटतं की, आपण अत्तर विकायला हवं. आता हे अत्तर नक्की कोणाचं आहे. त्यावर सध्या राजकारण सुरू आहे. राजकारणामध्ये प्रत्येकाला आता अत्तराची गरज आहे. कोणीही कितीही टीका केली तरी त्या अत्तराशिवाय कुणी राहूच शकत नाही. गोवा, यूपी आणि महाराष्ट्रात अत्तराचे बुदले कोण रिकामी करत होते. त्यामुळे राजकारणासाठी सर्वच हमाम असतात, असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम

मुख्यमंत्र्यांची प्रकृती अत्यंत उत्तम आहे. विधानसभेचं कामकाज अत्यंत सुरळीत पार पडलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जबाबदारी होती. तसेच त्यांनी टोले देत -टोले घेत. अत्यंत उत्तम प्रकारे अधिवेशन पार पडलं. त्यामुळे मला असं वाटतं की, मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण अधिवेशनावर लक्ष होतं. मुख्यमंत्र्यांची तब्येत आता बरीचशी सुधारली आहे. काही त्यांच्यावर निर्बंध आहेत. तर काही पत्थे आहेत. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी झाल्यानंतर ते नेहमीच्या कामाला लागतील. विधानसभेत जरी मुख्यमंत्री नसले तरी ते संपूर्ण कामकाज चांगल्यारित्या पार पाडत होते. अजित पवार यांच्याकडे जबाबदारी होती. ती पूर्णपणे त्यांनी पार पाडली, असं राऊत म्हणाले.

राज्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची राज्याला गरज आहे, असा प्रश्न प्रसार माध्यमांनी विचारला असता, लॉकडाऊनमध्ये मुख्यमंत्रीचं काम करत होते. त्यावेळी मुख्यमंत्री मंत्रालयात जात नव्हते. त्यावेळी इतर मंत्री सुद्धा जात नव्हते. जिथे उद्धव ठाकरे आहेत तिथून ते कोरोना महामारीसाठी लढाई करत आहेत, असं राऊत म्हणाले.


हेही वाचा : Omicron Variant: ओमिक्रॉनच्या रुग्णांचा वाढता आलेख, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकीकडे लक्ष