महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आणणं ही आमची जबाबदारी – खासदार संजय राऊत

राज्यसभेच्या निवडणुकीचे (Rajya Sabha elections) चित्र आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीकडून प्रयत्न झाले की, निवडणूक महाराष्ट्रात शक्यतो राज्यसभेची निवडणूक आपण ऐकमेकांच्या सहकार्याने लढवतो. कोणत्याही प्रकारे घोडेबाजाराला वाव राहू नये. यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केले आहेत. त्यादृष्टीने महाविकास आघाडीचे नेते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली. काही प्रस्तावांचा अदान-प्रदान झालं. पुढील ३ ते ४ तासांमध्ये असं काहीही घडलं नाही तर दोन्ही पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. भारतीय जनता पक्ष त्यांचा उमेदवार मागे घेण्याच्या तयारीत नाहीये. तसेच शिवसेनेचे दुसरे उमेदवार हे सुद्दा रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीची जी काही प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेला सामोरे जाणे आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आणणे ही आमची जबाबदारी आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

आमचा सहावा उमेदवार अगदी व्यवस्थित निवडून येईल 

खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आणणे ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालची महाविकास आघाडी असून त्या महाविकास आघाडीला पूर्णपणे खात्री आहे की, आमचा सहावा उमेदवार सु्द्धा अगदी व्यवस्थित निवडून येईल, असं राऊत म्हणाले.

कसोटी आजी की माजी मुख्यमंत्र्यांची ?

ही कसोटी आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांची नाहीये. पण ही निवडणूक आहे, जर सामोपचारने काही मार्ग निघाला असता तर दोघांनाही हवं होतं. पण नाही झालं. त्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकू. कारण ज्याअर्थीने आम्ही आमचा उमेदवार कायम ठेवला आहे. त्यामुळे आमची पूर्ण तयारी आहे. आम्ही निवडणूकांना घाबरत नाहीये. महाराष्ट्रात आमचं सरकार आहे. जसं केंद्रात तुमचं सरकार आहे. तसं महाराष्ट्रात आमचं सरकार आहे. आमदारांचा आणि मुख्यमंत्र्यांचा उत्तर समन्वय आहे, असं राऊत म्हणाले.

मुळात राजकीय पक्षाच्या आमदारांना मत हे दाखवायचं असतं. त्यामुळे तो प्रश्न निर्माण होत नाही. इतर लढाई ही अपक्ष आणि इतर पक्षांसोबत आहे. पण गेल्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री आणि सरकारने या सगळ्यांशी उत्तम संवाद ठेऊन अनेकांच्या मतदार संघातली महत्त्वाची कामं केल्यामुळे हे सर्व आमदार महाविकास आघाडीसोबत जोडले गेले आहेत. आता यांना फूस लावण्याचे आणि केंद्रीय तपास यंत्रणाचे वापर करण्याचे प्रकार सुरू झाल्याचं आमच्या कानावर आलेलं आहे. परंतु ही त्यांची राजकारण करण्याची पद्धत आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आता संपली आहे. त्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांचे मिळून सर्व उमदेवार रिंगणात आहेत. परंतु हा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागेल, असं संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा : निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन