घरमहाराष्ट्रशिवसेना मोठ्या ताकदीने उसळी घेईल, संजय राऊतांनी बांधला चंग

शिवसेना मोठ्या ताकदीने उसळी घेईल, संजय राऊतांनी बांधला चंग

Subscribe

शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत याचं भान चिखलफेक करणाऱ्यांनी राखलं पाहिजे. चिखलफेक करणाऱ्यांनी आपलं कर्तृत्त्व पाहावं. आपल्या हातात अमर्याद सत्ता आहे म्हणून अशी विधानं करू नये, असंही संजय राऊत म्हणाले.

मुंबई – पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. जामिनावर सुटल्यापासून त्यांनी पुन्हा शिवसेनेच्या पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेना पुन्हा अनेक ताकदीने उसळी घेईल असं वाटतंय, असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्या प्रकरणातील 6 आरोपींची सुटका; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांना भेटण्याकरता पदाधिकारी येत आहेत. मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे. पक्षप्रमुख सूचना देत आहेत. शिवसेना पुन्हा अनेक ताकदीने उसळी घेईल असं वाटतंय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर सगळ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे सगळ्यांचे बुडबुडे फुटायला लागले आहेत. शिवसेनेची लाट दिसतेय, याचा परिणाम महाराष्ट्रात दिसतोय. आज तीन जिल्ह्याचे प्रतिनिधी आले होते. त्यांना पक्षबांधणीचे मार्गदर्शन आज करण्यात आलं, असं संजय राऊत म्हणाले.

शरद पवार यांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्यावर राऊतांनी पलटवार केला आहे. शरद पवार, ठाकरे त्यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून पक्ष आकर्षित करणे याचा अर्थ ते स्वतःच्या कामावर, कार्यावर उभे नाहीत. आमच्यावर चिखलफेक करून ते उभे आहेत, असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला, त्यांच्या ताब्यात जर…; बावनकुळेंची घणाघाती टीका

शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत याचं भान चिखलफेक करणाऱ्यांनी राखलं पाहिजे. चिखलफेक करणाऱ्यांनी आपलं कर्तृत्त्व पाहावं. आपल्या हातात अमर्याद सत्ता आहे म्हणून अशी विधानं करू नये, असंही संजय राऊत म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -