घरताज्या घडामोडीकाँग्रेस नेते नाना पटोलेंच्या अनुपस्थितीवर संजय राऊतांची सारवासारव; म्हणाले...

काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या अनुपस्थितीवर संजय राऊतांची सारवासारव; म्हणाले…

Subscribe

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची राज्यातील पहिली संयुक्त सभा रविवारी छत्रपती संभाजीनगरात झाली. या सभेला तिन्ही पक्षाचे नेतेमंडळी उपस्थित होते. परंतु, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नव्हते. नाना पटोलेंच्या अनुपस्थितीतवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची राज्यातील पहिली संयुक्त सभा रविवारी छत्रपती संभाजीनगरात झाली. या सभेला तिन्ही पक्षाचे नेतेमंडळी उपस्थित होते. परंतु, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नव्हते. नाना पटोलेंच्या अनुपस्थितीतवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, आजारी असल्यामुळे नाना पटोले सभेला अनुपस्थित राहिल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच, त्यांच्याशी बोलणं झाल्याचेही राऊतांनी सांगितले. (Sanjay Raut summary on the absence of Congress leader Nana Patole In yesterday meeting sambhaji nagar)

खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत नाना पटोलेंच्या अनुपस्थितीवर स्पष्टिकरण दिले. यावेळी “राज्यभरात महाविकास आघाडीच्या अनेक सभा होणार आहेत. रविवारी झालेली छत्रपती संभाजीनगरमधील सभा अत्यंत्य उत्तमरित्या पार पडली. नाना पटोले कालच्या सभेला उपस्थित नसले तरी, ते काल आजारी असल्यामुळे दिवसभर त्यांच्या मुंबईच्या घरी झोपूनच होते. नाना पटोले यांची प्रकृती ठिक नाही. कालच्या सभेला पटोलेंनी येण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, आजारी असल्यामुळे ते दिवसभर घरीच होते. यासंदर्भात मी माहिती घेतली असून, पटोलेंशी माझे बोलणेही झाले आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“नाना पटोले उपस्थित नसले तरी, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात होते. हे सर्व नेते काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करत होते. काल सभेला काँग्रेस नव्हती असे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित होते. पुढच्या सभेला नाना पटोले नक्कीच उपस्थित असतील”, असेही संजय राऊत म्हणाले.

पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत यांना नाना पटोले सुरतला जाणार आहेत, असा सवाल विचारण्यात आला. त्यावर “आज नाना पटोले यांना सुरतला जायचं आहे, म्हणून त्यांनी काल आराम केला”, असे उत्तर दिले.

- Advertisement -

हेही वाचा – ही डिग्री खरी आहे का खोटी? हे पंतप्रधानांनीच सांगावं; संजय राऊतांचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -