घरताज्या घडामोडीमहाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतली रोखठोक मुलाखत

महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतली रोखठोक मुलाखत

Subscribe

शिवसेना खासदार आणि सामना संपादक संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेऊन विविध प्रश्नांबाबत उद्धव ठाकरे यांना बोलते केले. या मुलाखतीचा टीझर संजय राऊत यांनी प्रदर्शित केला आहे. २६ आणि २७ जुलै रोजी ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेला खिंडार पडले आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यापाठोपाठ अनेक खासदार, नगरसेवक, पदाधिकारीही शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे एकाकी पडलेल्या शिवसेनेला वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवानेता आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार आणि सामना संपादक संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेऊन विविध प्रश्नांबाबत उद्धव ठाकरे यांना बोलते केले. या मुलाखतीचा टीझर संजय राऊत यांनी प्रदर्शित केला आहे. २६ आणि २७ जुलै रोजी ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. (Sanjay Raut takes exclusive interview of Uddhav Thackeray, teaser released)

हेही वाचा – शिवसेनेला मोठा धक्का; माजी आमदारासह अनेकांचा शिंदे गटात प्रवेश

- Advertisement -

मुख्यमंत्री झाल्यावरही घरातून कारभार सांभाळणारे उद्धव ठाकरे आता पक्षासाठी रस्त्यावर उतरून मोर्चे काढणार का? सत्तेतून बाहेर पडल्यानंतरही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी कायम राहणार का? अशाप्रकारचे अनेक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसंच, महाविकास आघाडीचा प्रयोग चुकीचा ठरला का? असाही प्रश्न त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला आहे. या प्रश्नाचंही ते काय उत्तर देतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.


शिवसेना नक्की कोणाची? शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा? शिवसेनेवर शिंदे गट दावा करणार का? असे अनेक प्रश्न सामान्य वर्गाच्या मनात आहेत. बंडखोरी कोणी केली? का केली? या सर्व प्रश्नांची उत्तरे या मुलाखतीत मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या ४० आमदारांचं मनोगत त्यांनी ट्विट केलं होतं. प्रत्येक आमदार स्वखुशीने शिंदे गटात सामील झाल्याचा त्यांचा दावा होता. तसेच, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांकडे दुर्लक्ष केलं, राष्ट्रवादीने सेनेच्या आमदारांना निधी दिला नाही, महाविकास आघाडीतील घटकपक्षाने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला असे विविध आरोप करण्यात आले होते. या सर्व आरोपांवर उद्धव ठाकरे काय सडेतोड उत्तरे देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ज्यांना शेंदूर फासला ते शिवसेना गिळायला निघालेत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -