हिरेन मृत्यूप्रकरणात घाईघाईने NIAने घुसणं, यातच काहीतरी काळंबेरं – राऊत

shiv sena mp sanjay raut criticized on ncb
Cruise Drugs Case: महाराष्ट्रातून फिल्म इंडस्ट्री निघून जाण्यासाठीचं हे षडयंत्र - संजय राऊत

स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन संशयित मृत्यू प्रकरणी सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. याप्रकरणातमध्ये संशयित आरोपी म्हणून पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव सातत्याने घेतलं जात आहे. याच प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, ‘हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नये. कोणाचाही मृत्यू हा वाईटचं असतो. मग तो अन्वय नाईक किंवा त्यांच्या आईचा असेल, खासदार मोहन डेलकरांचा असेल किंवा मनसुख हिरेन यांचा असेल. अनैसर्गिक मृत्यूची चौकशी आणि त्याचा तपास व्हायला पाहिजे. यासंदर्भात मुंबईचे पोलीस, राज्याच्या तपास यंत्रणा या सक्षम आहेत. पण याप्रकरणी एटीएसकडे तपास सुरू झाला, निष्कर्ष अद्याप आला नाही. अशातच घाईघाई एनआयएने तपासात घुसावं यातच काहीतरी काळबेरे दिसत आहे.’

पुढे संजय राऊत म्हणाले की, आताचे विरोधी पक्ष जे पहिला सत्ताधारी होते. त्यांना अशाप्रकारे शंका घेणे म्हणजे राज्याच्या प्रशासनाचं आणि पोलीस दलाचं खच्चीकरण करण्यासारखं आहे. पोलिसांवर होणाऱ्या आरोपांबद्दल विचारले असता राऊत म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी अशाप्रकारे कोणाच्या तोंडाला काळं फासू नये. विरोधी पक्षनेते हे संसदीय लोकशाहीतलं महत्त्वाचं हत्यार, साधन आहे. विरोधी पक्षनेते हा संसदीय लोकशाहीतील जिवंतपणा ठेवतात. देवेंद्र फडणवीस स्वतः ५ वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांना माहिती आहे कसं चालतं पोलिसांच काम अशाप्रकारे भाषा वापरणे हे विरोध पक्षनेत्यांच्या प्रतिष्ठेला हानीकारक आहे.

दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल (मंगळवार) कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. संसदेत यांची सुविधा होती. त्याविषयी राऊत म्हणाले की, थोडासा हात दुखतोय बाकी काही नाही.


हेही वाचा – सचिन वाझे डान्सबार, लेडीजबारवरही धाडी टाकण्यात होते आघाडीवर