Homeताज्या घडामोडीSanjay Raut : स्वत:कडे मुख्यमंत्रिपद न ठेवता बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला मोठं केलं...

Sanjay Raut : स्वत:कडे मुख्यमंत्रिपद न ठेवता बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला मोठं केलं – संजय राऊत

Subscribe

महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात अनेक दशकं झंझावात निर्माण करणारे महान नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) जयंती आहे. यानिमित्तानं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विविध क्षेत्रांतून मानवंदना दिली जात आहे. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त भाष्य केले.

मुंबई : महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात अनेक दशकं झंझावात निर्माण करणारे महान नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) जयंती आहे. यानिमित्तानं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विविध क्षेत्रांतून मानवंदना दिली जात आहे. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त भाष्य केले. बाळासाहेब कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत. गव्हनर्र झाले नाहीत. केद्रात मंत्री झाले नाहीत. ही सगळी पदं त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आणि सामन्य शिवसैनिकांना दिली, असे संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut Talk On Balasaheb Thackeray Shiv Sena )

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भाष्य केलं. त्यानुसार, “शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे. बाळासाहेब ठाकरे आज आपल्यात नाहीत. पण बाळासाहेंबांनी स्वत:चं विश्व उभं केलं. त्यामध्ये मराठी माणासाला स्वाभिमानाने जगण्यासाठी केलेलं संघर्ष आहे. बाळासाहेबांनी गर्वानी हिंदू म्हणून जगण्याचा मंत्र दिला. त्यातून हा देश आणि महाराष्ट्र घडत राहिला. त्यातून दोन पिढ्या तयार झाल्या आहेत, असे बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान राहिले आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर या महाराष्ट्राला स्वाभिमाची आणि लढण्याची प्रेरणा देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. आजही पिढ्या बदलल्या पण येणारी प्रत्येक मराठी पिढी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे ऋण मान्य करत त्यांचा विचार इतरांना देऊन, पुढच्या पिढीकडे जाते”, असेही संजय राऊत म्हणाले.

“बाळासाहेब ठाकरे यांनी या देशाला, समाजाला बऱ्याच गोष्टी दिल्या. बाळासाहेब कधीच स्वत: सत्तेवर आले नाहीत. बाळासाहेब कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत. गव्हनर्र झाले नाहीत. केद्रात मंत्री झाले नाहीत. ही सगळी पदं त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आणि सामन्य शिवसैनिकांना दिली. सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर आणि वीर करण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं”, असेही संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – Dirty Politics : महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीतील गुजराती राज्यकर्त्यांनी ‘पंक्चर’ केला, ठाकरे गटाची घणाघाती टीका