घरताज्या घडामोडीमातोश्रीवर खासदारांची बैठक का झाली? संजय राऊतांनी सांगितलं कारण, म्हणाले राष्ट्रपती...

मातोश्रीवर खासदारांची बैठक का झाली? संजय राऊतांनी सांगितलं कारण, म्हणाले राष्ट्रपती…

Subscribe

या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेला शिंदे गटाने दणका दिल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी आज मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. (Sanjay Raut talked about president election)

हेही वाचा – शिवसेनेचे खासदारही वेगळ्या मार्गाच्या विचारात, ठाकरेंच्या बैठकीला फक्त 12 खासदार उपस्थित, 7 गैरहजर

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, खासदारांच्या बैठकीत बहुतेक खासदार उपस्थित होते. संजय बंडू जाधव वारी करून आले होते, म्हणून आजारी आहेत. त्यामुळे त्यांना येता आले नाही. हेमंत जाधव यांनी फोन करून येणार नसल्याचं कळवलं होतं. तर, गुजरातमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याने कलाबाई देलकर येऊ शकल्या नाहीत. मात्र, श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी यांच्याविषयी काही माहिती नाही, असं संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, या बैठकीत निश्चितच राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली. यावेळी दोन्ही बाजूंनी चर्चा करण्यात आली. द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला राष्ट्रपती पदासाठी उभ्या असून यशवंत सिन्हा यांच्याबाबातही या बैठकीत चर्चा झाली.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रपती निवडणूक : शिवसेना हॅटट्रिक साधणार का? मुर्मू यांना पाठिंबा देण्याची शक्यता

शिवसेना कोणाला पाठिंबा देणार?

राष्ट्रपती पदासाठी उभ्या राहिलेल्या कोणत्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेनेने अनेकदा राजकारणापलिकडे जाऊन राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना पाठबळ दिलं आहे. तसंच, यावेळीही एकमताने निर्णय घेतला जाईल. आजच्या बैठकीत सर्व खासदारांनी निर्णय घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अधिकार दिले आहेत. आणि पक्षप्रमुखांनी दिलेल्या निर्णयाविरोधात जावू शकत नाहीत.

हेही वाचा धनुष्यबाण चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाकडे, शिवसेनेकडून कॅव्हेट दाखल

दरम्यान, शिवसेनेच्या एकूण 19 लोकसभा खासदारांपैकी 12 खासदार बैठकीला उपस्थित होते, तर 7 खासदार अनुपस्थित होते. शिवसेनेचे लोकसभेत 19 खासदार असून, राज्यसभेत तीन सदस्य आहेत. त्या 19 खासदारांपैकी गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत , विनायक राऊत, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, प्रताप जाधव, सदाशिव लोखंडे, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, राजेंद्र गावित हे उपस्थित होते. तर राज्यसभेत संजय राऊत, प्रियंका चतुर्वैदी आणि अनिल देसाई हे खासदार आहेत. परंतु संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी उपस्थित असल्या तरी शिवसेनेचे खासदार अनिल देसाईसुद्धा बैठकीला उपस्थित नव्हते. कारण ते दिल्लीत असल्याचं सांगितलं जात आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -