घर महाराष्ट्र "यांनी स्वतःच्या आईला..." संजय राऊतांनी साधला शिंदे गटावर निशाणा

“यांनी स्वतःच्या आईला…” संजय राऊतांनी साधला शिंदे गटावर निशाणा

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे तर कायमच या पक्षफुटीच्या मुद्द्यावरून निशाणा साधत असतात. आजही त्यांनी पुन्हा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिंदे गटावर सडकून टीका केली.

मुंबई : जून 2022 मध्ये शिवसेनेमध्ये मोठा भूंकप झाला आणि दोन गट तयार झाले. ज्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठे राजकीय युद्ध झाले. या दोन्ही गटांमध्ये खरी शिवसेना कोणती? यावरून वाद सुरू असताना निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले. या घटनांना वर्ष उलटले असले तरी ठाकरे गटातील नेत्यांच्या मनावर याचे व्रण आजही कायम आहेत. ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे तर कायमच या फुटीच्या मुद्द्यावरून निशाणा साधत असतात. आजही त्यांनी पुन्हा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिंदे गटावर सडकून टीका केली. (Sanjay Raut targeted Shinde group due to party split)

हेही वाचा – नीती आयोगाच्या हाती मुंबईची सूत्र, संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका

- Advertisement -

संजय राऊत यांचे बंधू आणि विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनील राऊत यांनी त्यांना देखील 100 कोटींची ऑफर देण्यात आली होती, असा दावा एका कार्यक्रमात केला. याचबाबतचा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारला असता ते म्हणाले की, मला आणि माझ्यासोबतच्या अनेकांना ही ऑफर आली होती. तुरुंगात जायचे नसेल तर अमुक अमुक गटाकडे जा. आम्हाला देखील दिल्लीतून फोन आले होते. आमच्यासह अनेकांवर दबाव टाकण्यात आले. परंतु आम्ही फुटलो नाही. आम्ही आमची निष्ठा विकली नाही. शिवसेनेला विकणे म्हणजे स्वतःच्या आईला विकणे होय. ममत्वाला विकून यांनी स्वतःची आई विकली. 2024 झाली यांना पश्चाताप होईल, अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली.

यावेळी त्यांनी उद्यापासून होणाऱ्या विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीबाबतची देखील माहिती दिली. आम्ही गेल्या महिन्याभरापासून इंडिया आघाडीच्या बैठकीची तयारी करत आहोत. शिवसेनेकडे यजमान पद असले तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे जातीने यात लक्ष घालत आहेत. आज 4 वाजता हयात हॉटेलमध्ये या तयारीबाबतची पत्रकार परिषद पार पडेल. या बैठकीची व्यवस्था पाहण्यासाठी काल मविआतील नेते काल बैठकीस्थळी उपस्थित होते. त्यामुळे आता पारंपारिक पद्धतीने इंडियाच्या आघाडीच्या नेत्यांचे स्वागत केले जाईल. मी खात्रीने सांगतो 2024 पर्यंत हुकूमशाहीचा आणि भाजपचा पराभव झालेला असेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -