घरताज्या घडामोडीकोरोना सोडून पंतप्रधानांनी इतर विषयांवर तारा छेडल्या, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

कोरोना सोडून पंतप्रधानांनी इतर विषयांवर तारा छेडल्या, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासह बिगर भाजपशासित राज्यांना इंधन दरवाढीत कपात न केल्यामुळे टोला लगावला आहे. कोरोनाचा विषय सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर विषयांवर तारा छेडल्या आहेत असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पंतप्रधानांनी बिगर भाजपशासित राज्यांना टोमणा मारला आहे. त्यांचा संवाद हा एकतर्फी होता अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीबाबत प्रश्न विचारला होता. राऊत म्हणाले की, कालची जी बैठक होती. त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांना कोरोनासंदर्भातील परिस्थितीवर मार्गदर्शन करणार होते अशी चर्चा होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर विषयांवर जास्त तारा छेडल्या आहेत. ममता बॅनर्जी असतील, के सी चंद्रशेखर राव, उद्धव ठाकरे असतील यांची वक्तव्य पाहिल्यास कळेल की, तो एकतर्फी संवाद होता. बिगरभाजपशासित राज्य आहेत. त्या मुख्यमंत्र्यांना टोमणे मारण्याचे काम जास्त झाले आहे. पंतप्रधानांकडून अशी अपेक्षा नव्हती असे संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांना सांगायचे होते ते सांगितले

दरम्यान संजय राऊत म्हणाले, व्हॅट संदर्भात जे वक्तव्य झाले तो विषय अनावश्यक होता असे सगळ्याच बिगरभाजपशासित मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी बाण्याला जागून त्यांना जे काही सांगायचे होते ते सांगितले आहे.

शिवसेनेची सभा होणार

मुंबईत शिवसेनेची सभा होणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच भाजप-राष्ट्रवादीची २०१७ मध्ये युती होणार होती. यावर राऊथ म्हणाले की, कोणीतरी अफवा पसरवत आहे. उद्या काय घडणार हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे या जुन्या पाचोळ्यावर फार पाय ठेवून कशाला आवाज करत आहेत असे काही घडले नाही.

- Advertisement -

मोहित कंबोजांवर राऊतांचा पलटवार

मोहित कंबोज यांच्या आरोपांवर राऊत म्हणाले की, मला कोणी आरोप केले आहेत माहिती नाही. कोणाचे कोणासोबत फोटो आहेत हे महत्त्वाचे नसून संबंधित व्यक्तीबरोबर ज्याला ईडीने अटक केली होती २०० कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्याच्याशी कोणाचे व्यवहार झालेत त्यांना का ईडीने चौकशीला बोलवलं नाही हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर या लोकांनी दिले पाहिजे. पण सत्य बोलले की त्याच्यापासून पळ काढायचा आणि भूमिगत व्हायचे. दुसऱ्या विषयावर लोकांना विचलित करायचे हे यांचे धोरण आहे. सध्या मोबाईल आणि कॅमेरा या काळात कोण कोणामध्ये फोटो काढेल हे काही कोणी सांगु शकत नाही असे संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा : राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळणार?, पोलीस नोटीस देण्याची शक्यता

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -