आयुष्य स्वप्न बघण्यातच जावं; मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावरुन राऊतांचा फडणवीसांना टोला

Sanjay Raut and Devendra Fadnavis
आयुष्य स्वप्न बघण्यातच जावं; मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावरुन राऊतांचा फडणवीसांना टोला

आजही मीच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं वक्तव्य करणारे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. तसंच, कधी कधी लोकांना वाटतं की अजूनही यौवनात मी, असा खोचक टोला देखील राऊत यांनी लगावला. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

ठअजूनही यौवनात मी, असं कधी कधी लोकांना वाटतं. असं नाटक फार गाजलं रंगमंचावर, ते चिरतरुण नाटक होतं. तसं अनेकांना वाटतं अजुनही यौवनात मी, अजुनही मुख्यमंत्री मी, असा टोला राऊत यांनी लगावला. पुढे बोलताना त्यांनी आम्हालाही कधी कधी दिल्लीत गेल्यावर वाटतं आमचाच प्रधानमंत्री होणार,” असं राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी मी ग्राऊंडवर फिरतो म्हणून जनतेला मीच मुख्यमंत्री वाटतो. यावर बोलताना राऊत यांनी जोरदार टोला लगावला. फडणवीस यांची भावना योग्य आहे. माणसाने स्वप्नात रममाण व्हावं, चांगली स्वप्न पाहावीत, स्वप्नांना, पंखांना बळ असावं, ते त्यांच्या पंखात अधिक बळ येवो, स्वप्न पाहण्यासाठी आणि आकाशात अधिक उडण्यासाठी, अशा शुभेच्छा देत त्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यात जावं, असा टोला देखील राऊत यांनी फडणवीस यांना लगावला.

‘मला आजही मीच मुख्यमंत्री आहे असं वाटतं’ – देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई येथे महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्यासारखे नेते माझ्या पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही, तो काय करतो हे महत्त्वाचं आहे. गेले दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला जनतेने देखील हे जाणवू दिलं नाही की मी आता मुख्यमंत्री नाही आहे. विरोधी पक्षनेता म्हणून काम करतोय. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी पहिल्यांदा गोवर्धिनी मातेकडेच मी येणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी नवी मुंबईत पुन्हा आम्हीच निवडून येऊ आणि आम्ही पुन्हा एकदा सेवा करू, असा विश्वासही व्यक्त केला.


हेही वाचा – उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याने फिल्डवर असलेले फडणवीसच जनतेला मुख्यमंत्री वाटतात – चंद्रकांत पाटील