Homeमहाराष्ट्रSanjay Raut : अर्थसंकल्पादिवशी मोदींनी जोरजोरात बाक वाजवण्यावरून राऊतांचा खोचक टोला, म्हणाले,...

Sanjay Raut : अर्थसंकल्पादिवशी मोदींनी जोरजोरात बाक वाजवण्यावरून राऊतांचा खोचक टोला, म्हणाले, ‘त्यांना…’

Subscribe

मुंबई : अर्थसंकल्प समजण्यासाठी 71 तास लागतात. बाईंनी अर्थसंकल्प वाचला आणि लगेच आम्हाला तो कळाला, असे कुणी म्हणत असेल, ते मुर्ख आहेत. आपल्या कोणते तज्ज्ञ आहेत, त्यांना लगेच अर्थसंकल्प कळाला? पंतप्रधान नरेंद्र मोदी जोरजोरात बाक वाजवत होते, त्यांना काय अर्थसंकल्प कळाला? असा खोचक सवाल शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ते मुंबई प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले, “अर्थमंत्री पदावरील व्यक्ती खडूस, कठोर, दया बुद्धीने काम न करणारी व्यक्ती असते. कुणाच्या खिशातून हात घालायचा कुणाची पाकीटे मारायची, यासाठी अर्थमंत्र्यांची नियुक्ती असते. पंतप्रधानांना ज्या गोष्टींचा वाईटपणा घ्यायचा असतो, तो अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून घेत असतात.”

हेही वाचा : फडणवीसांचे कुटुंब वर्षा बंगल्यात जायला घाबरते का? संजय राऊतांनी का केला असा सवाल

“आपल्या अर्थसंकल्पात महागाई, बेरोजगारी कमी करण्यासाठी काही योजना आहेत का? महागाई, बेरोजगारी कमी करम्यासाठी काही योजना नसतील, तर मध्यमवर्गीयांचे कसे काय भले होणार? डॉलरच्या तुलनेत रूपया 87 रूपयांवर आला आहे. 12 लाख रूपयांपर्यंत प्राप्तिकरातून सूट, यापेक्षा मध्यवर्गीयांसाठी कोणतीही योजना मला अर्थसंकल्पात दिसत नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“मुळात 12 लाख कर भरण्यासाठी तेवढा महसूल आणावा लागेल. अनेक ठिकाणी उच्च शिक्षित, पदवीधर कंत्राटपद्धतीवर काम करतात. त्यांचे उत्पन्न उघडपणे कागदावर येतच नाही. साडेतीन ते चार कोटी लोक कर भरतात. मग, त्यात 12 लाख वाले किती आहेत? याचा खुलासा खडूस अर्थमंत्र्यांनी करावा,” असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.

“अर्थसंकल्प समजण्यासाठी 72 तास लागतात. बाईंनी अर्थसंकल्प वाचला आणि लगेच आम्हाला हे कुणी म्हणत असेल, तर ते मुर्ख आहेत. अर्थसंकल्प जाणून घेण्यासाठी आम्ही नानी पालखीवाला यांचे भाषण ऐकायला जायचो. आपल्याकडे असे कोणते तज्ज्ञ आहेत, त्यांना लगेच अर्थसंकल्प कळाला? मोदी जोरजोरात बाक वाजवत होते, त्यांना काय अर्थसंकल्प कळाला?” असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

हेही वाचा : पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी, गोंधळानंतर महेंद्र गायकवाडने सोडलं मैदान