औरंगाबाद : राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या पत्रकार परिषदेला जाण्याची ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत यांनी जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. यानंतर पत्रकार परिषदेला नको तेवढी सुरक्षा व्यवस्था दिली गेली आहे. या परिषदेसाठी पत्रकारांवर निर्बंध घातले आणि पास तयार केले गेले, असे यापूर्वी कधी झाले नव्हते. आमची ऐवढी भीती आहे, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पत्रकार परिषदेसंदर्भात म्हणाले, “जर मला संधी दिली, तर मी तिथे जाऊन नक्की पत्रकार परिषदेमध्ये जाऊन प्रश्न विचारेन. मी पत्रकार आहे. त्यानंतर येथे ऐवढा गोंधळ झाला. पत्रकार परिषदेला नको तेवढी सुरक्षा व्यवस्था दिली. पत्रकारांना सुद्धा निर्बंध घातले. परिषदेसाठी पास तयार केले गेले, असे कधी होत नव्हते. ऐवढी आमची भीती आहे. एक पत्रकार म्हणून माझा जन्म झाला. मला रात्री पोलीस भेटायला आले आणि अधिकाऱ्यांचे फोन आले. दोन प्रश्न काय मी विचारायच प्रश्न निर्माण केला. तर तुमची ऐवढी धावपळ होते. येथे बसलेल्या मीडियाने जे प्रश्न विरोधी पक्षाला विचारले जात आहेत. ते प्रश्न सरकारला विचारावे, अशी माझी भूमिका आहे.”
हेही वाचा – राज्य मंत्रिमंडळाची आज मराठवाड्यात बैठक; 40 हजार कोटींचे पॅकेज?
आज होणाऱ्या पत्रकार परिषदेला तुम्ही जाणार का, तुमची इच्छा आहे का? यावर सजंय राऊत म्हणाले, “पोलीस आयुक्तांनी सांगितेल की, तुम्ही पास घेतला.पोलीस आयुक्तांकडे जास्त माहिती असेल, मी संपादक आहे आणि या महाराष्ट्राचा सर्वा जास्त ज्येष्ठ संपादक आहे. मी पत्रकार आहे आणि वार्ताहर सुद्धा आहे. माझी इच्छा झाली तर मी जाईन. मला आडवण्याचा प्रयत्न होईल आणि मला गोंधळ नको.”