‘ते फक्त त्यांचे मत’ तुमचे नशीब नाही’, संजय राऊतांचा निशाणा नेमका कोणावर?

उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना ५० पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवणार आहे. यंदा गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन निश्चित होणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितले आहे.

Sanjay Raut targets pm modi said center agency Separate syndicate started with BJP leaders

तुमच्याबद्दलच्या मतांनी नाराज होऊ नका ते त्यांचे मत आहे. तुमचं नशीब नाही असे सूचक ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी अनेक दिवसानंतर ट्विट केलं आहे. राजकीय वर्तुळात नेहमीच संजय राऊत घणाघाती टीका आणि स्फोटक विधाने करत असतात. रोजच्या दैनंदिनमध्ये राजकीय घडामोडींवर राऊत वक्तव्य करत असतात परंतु ट्विट करुन क्वचितच व्यक्त होतात. देशातील ५ राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत तयारीला लागले आहेत. गोवा आणि युपीमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचे राऊत म्हणाले आहेत. याच पार्श्वभूमीवर हे ट्विट केलं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शिवसेना खासदार सजंय राऊत यांनी नवीन ट्विट करुन राजकीय वर्तुळात चर्चा करण्यासाठी विषय दिला आहे. परंतु संजय राऊतांचा नेमका रोख कोणावर आहे? याबाबत स्पष्टता आली नाही. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, तुमच्याबद्दल इतरांनी केलेल्या मताने नाराज होऊ नका, ते फक्त त्यांचे मत असून तुमचं नशीब आहे. अशा आशयाचे ट्विट करत राऊत यांनी नेमका कोणावर निशाणा साधलाय याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

खासदार संजय राऊत गोव्यातील आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. शिवसेना गोवा आणि युपीची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे राऊतांनी सांगितले आहे. तसेच गोव्यात महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही राऊत म्हणाले आहेत. महाविकास आघाडीच्या प्रयोगासाठी काँग्रेससोबत चर्चा सुरु आहे. परंतु काँग्रेसला एकहाती सत्ता आणू असे वाटत असेल तर त्यांचे स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्षांसह शिवसेना युती करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. शिवसेनेला गोव्यात चांगले यश मिळेल अशी शक्यता असल्याचे संजय राऊत म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना ५० पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवणार आहे. यंदा गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन निश्चित होणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितले आहे. भाजपच्या नेत्यांनी आणि आमदारांनी पक्ष सोडला आहे. युपीमध्ये अनेक आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे सत्ता परिवर्तन होणार असल्याचे राऊत म्हणाले आहेत.


हेही वाचा : Corona : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह, भाजपच्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव