“तुमने बेवफाई की…”, व्हिडीओ शेअर करत संजय राऊतांचा बच्चू कडूंना टोला

Sanjay-Raut-Tweet-Bachchu-Kadu-Video
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक शेर शेअर करत बच्चू कडूंना टोला लगावला आहे.

बच्चू कडू यांनी मात्र नेहमीच शेतकरी आणि अपंगांसाठी आवाज उठवला. किंबहुना त्यांची हीच ओळख निर्माण होत गेली. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यातून ते नेहमी कष्टकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं दिसून आलं आहे. पण एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र अनेकदा बच्चू कडूंना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. नुकतंच एका वृद्ध शेतकऱ्याने बच्चू कडूंना सुनावलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक शेर शेअर करत बच्चू कडूंना टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक शेर शेअर केलाय. यासोबत आजोबांनी बच्चू कडूंना सुनावताचा व्हिडीओ देखील जोडलाय. हा व्हिडीओ शेअर करताना संजय राऊत यांनी लिहिलं की, “तुमने बेवफाई की वफा का नाम लेकर। हम वफादार बने रहे बेवफा का इल्ज़ाम सेह कर। तुम आंखे नहीं मिला सकते हमारा सबकुछ छीनकर। हम सर उठाकर चल सकते है सब कुछ छोड़ कर ।”

Sanjay-Raut-Tweet-Bachchu-Kadu
करताना संजय राऊत यांनी लिहिलं की, “तुमने बेवफाई की वफा का नाम लेकर….

आमदार बच्चू कडू हे धाराशिव इथल्या दौऱ्यावर असताना एका ८० वर्षीय आजोबांनी त्यांची गाडी अडवली. अर्जुन घोगरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. “तुमच्याकडून वेगळ्या अपेक्षा होत्या पण तुम्ही अयोग्य वर्तन केलं. शिंदे फडणवीस महाडाकू आहेत. तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात. तुमच्याकडून असं वर्तन अपेक्षित नव्हतं. यासाठी आम्ही जनतेने तुम्हाला निवडून दिलं होतं का?” अशा शब्दात या आजोबांनी बच्चू कडूंना खडसावलंय. महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही का त्रास दिलात…? तुमच्याकडून असं वागणं अपेक्षित नव्हतं, असं तावातावाने आजोबा बोलू लागले. यावेळी बच्चू कड़ूंनी मात्र आजोबांना टाळण्याचा प्रयत्न केला. बच्चू कडूंना ज्या आशेने निवडून दिलं, तसा तो वागत नाही. तो डाकूबरोबर गेला, देवेंद्र आणि शिंदेबरोबर गेला. हे जे काय चाललंय ते योग्य नाही, घटनाबाह्य आहे, असं ते आजोबा म्हणत आहे.