घरमहाराष्ट्रभगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याआधीच संजय राऊतांना आनंद, म्हणाले महाराष्ट्राच्या शत्रूंशी...

भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याआधीच संजय राऊतांना आनंद, म्हणाले महाराष्ट्राच्या शत्रूंशी…

Subscribe

शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आनंद व्यक्त केला आहे. राजभवनाची खिंड पडली, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त व्हायचं असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) यांनी दोनच दिवसांपूर्वी याचा खुलासा केला होता. त्यानंतर आज पुन्हा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरून शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. राजभवनाची खिंड पडली, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

हेही वाचा – …तर उठाव होणारच, राज्यपालांविरोधात संभाजीराजे आक्रमक

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रात आल्यापासून त्यांनी वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरू केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, मुंबईतील मराठी माणूस याबाबत त्यांनी नेहमीच वादाची भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांना पदमुक्त करण्यात यावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मुंबईतील मराठी माणसांबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना हायकमांडकडून जास्त न बोलण्याची तंबी देण्यात आली होती. त्यामुळे मधल्या काळात ते शांत होते. पंरतु, आता पुन्हा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. औरंगाबाद येथील कार्यक्रमात शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी यांची तुलना केल्याने ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. यावरून त्यांना दिल्लीतही बोलावून घेण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांची लवकरच गच्छंती होणार असल्याचं म्हटलं जात होतं. त्यातच, आता ते स्वतःहून पदावरून हटण्यास इच्छूक असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाकडून आनंद व्यक्त केला जातोय.

हेही वाचा – राज्यपालांची बेछूट वक्तव्ये बनतायत भाजपाची डोकेदुखी!

- Advertisement -

राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाविरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र!, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे.

हेही वाचा – उद्योगधंद्यावर आमचं धोतरही बोललं.., नक्कल करत राज ठाकरेंची राज्यपालांवर टीका

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -