घरताज्या घडामोडीशिंदे-फडणवीसांच्या कॅबिनेटचे निर्णयही घटनाबाह्य, राज्यपालांसाठी संजय राऊतांचं नवं ट्विट

शिंदे-फडणवीसांच्या कॅबिनेटचे निर्णयही घटनाबाह्य, राज्यपालांसाठी संजय राऊतांचं नवं ट्विट

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाबाबतही प्रश्न उभे केले आहेत. घटनेतील तरतुदींचा दाखला देत त्यांनी राज्यपालांनवरही निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीची शेवटची कॅबिनेट बेकायदेशीर असल्याचं सांगत शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा कॅबिनेट घेऊन काही निर्णयांवर नव्याने शिक्कामोर्तब केलं. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाबाबतही प्रश्न उभे केले आहेत. घटनेतील तरतुदींचा दाखला देत त्यांनी राज्यपालांवरही निशाणा साधला आहे. (Sanjay raut tweet on cabinet decision of Shinde-Fadnavis Government)

हेही वाचा – शिवसेनेच्या शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी उठाव – उदय सामंत

- Advertisement -

संजय राऊत यांनी ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले की, भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रिमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रिमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही. राज्यपाल, हे काय सुरू आहे?

हेही वाचा – देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री, विनायक मेटेंचं मोठं वक्तव्य

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवलं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी तातडीने मंत्रिमंडळ बैठक घेऊन २०० ते ३०० जीआर मंजूर करून घेतले. मात्र हे जीआर अनधिकृत असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. बहुमत सिद्ध करण्यास सांगितलेल्या सरकारला मंत्रिमंडळ घेण्याचा अधिकार नसतो, त्यामुळे अशा मंत्रिमंडळात घेतलेले निर्णय अवैध असल्याचं कारण पुढे करत शिंदे-फडणवीस सरकारने आज पुन्हा बैठक घेऊन ठाकरे सरकारच्या काही निर्णयांवर नव्याने शिक्कामोर्तब केलं.


या सर्व प्रकरणामुळे संतापलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही कायद्याचा बडगा उचलला आहे. त्यांनीही कायद्याचा दाखला देत २ जणांच्या मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णयही अवैध असल्याचं म्हटलं आहे. तसेच, याप्रकरणी त्यांनी राज्यपालांनाही प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा “स्किझोफ्रेनिया नावाचा एक रोग असतो– विजय शिवतारेंचा संजय राऊतांना टोला

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -