‘कब तक छीपोगे…’, झिरवळांचा फोटो शेअर करत संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला

शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठा बंड नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारला आहे. जवळपास शिवसेनेचे ३७ आमदार (Shiv sena) शिंदेंसोबत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनाही कोणतीही कमी न बाळगता बंडखोर आमदारांच्या विरोधात संघर्ष करत आहे.

shiv sena saamana on eknath shinde and bjp sanjay raut cm uddhav thackearay maharashtra political crisis

शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठा बंड नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारला आहे. जवळपास शिवसेनेचे ३७ आमदार (Shiv sena) शिंदेंसोबत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनाही कोणतीही कमी न बाळगता बंडखोर आमदारांच्या विरोधात संघर्ष करत आहे. मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या बैठका होत आहेत. अशातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे. “कब तक छीपोगे गोहातीमे.. आना हि पडेगा.. चौपाटीमे..”, असे म्हणत राऊतांनी बंडखोरांना मुंबईत येण्याचे आव्हान दिले आहे. (Sanjay Raut Tweet on Eknath shinde in which he challenges that rebel mlas have to reach mumbai)

संजय राऊतांनी ट्विटमध्ये विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा एक खास शैलीतला फोटो पोस्ट केला आहे. तसेच, “कब तक छीपोगे गोहातीमे.. आना हि पडेगा.. चौपाटीमे..”, असे लिहिले आहे. त्यामुळे ज्या आमदारांनी बंड पुकारला आहे. त्यांना मुंबईत यावे लागेलच असे या ट्विटरच्या माध्यमातून सांगत राऊतांनी आमदारांवर टीका केली.

हेही वाचा – प्रिय शिवसैनिकांनो नीट समजून घ्या.मविआचा खेळ ओळखा–एकनाथ शिंदे यांचे टि्वट

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वाव ठरावाचे पत्र दिले होते. मात्र त्यांची ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे हा एकनाथ शिंदे गटासाठी धक्का मानला जातो आहे. आताच्या राजकीय घडामोडींमध्ये महाराष्ट्रात सत्तेचा आणि सत्तेसाठीच्या समीकरणाचा पेच नाजूक वळणावर आहे. शिवाय, विधानसभा अध्यक्ष नसताना उपाध्यक्षांकडेच विधानसभा अध्यक्षांचे सगळे अधिकार असतात.

बंडखोर आमदारांचा मुक्काम वाढला

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा मुक्काम वाढला आहे. बंडखोर आमदारांचा आजचा साहावा दिवस असून, आणखी काही दिवस हे आमदार गुवाहटीतच मुक्कामाला राहणार आहेत. त्यानुसार, ३० जूनपर्यंच सर्व आमदार हे रेडिसन्स ब्लू हॉटेलमध्ये राहणार आहेत. त्यामुळे राजकिय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.


हेही वाचाबंडखोर आमदारांच्या मुक्कामात वाढ; ३० जूनपर्यंत गुवाहाटीतच राहणार