महाराष्ट्र भवनावरून संजय राऊतांचे सरकारला थेट आव्हान; म्हणाले, पहा जमतंय का!

Yogi Adityanath | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. याप्रकरणावरून राऊतांनी सातत्याने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. यावरूनच आता ट्वीट करून राऊतांनी सरकारला थेट आव्हान केलं आहे.

Yogi Adityanath | मुंबई – उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराजवळ महाराष्ट्र भवन उभारण्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी आता शिंदे-फडणवीस सरकारला आणखी एक आव्हान दिलं आहे. सरकारने बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा करावी, असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. याप्रकरणावरून राऊतांनी सातत्याने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. यावरूनच आता ट्वीट करून राऊतांनी सरकारला थेट आव्हान केलं आहे.

हेही वाचा – युपीत महाराष्ट्र भवन उभारणार; मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीत योगींचा होकार

संजय राऊत ट्वीटमध्ये म्हणतात की, अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आधीच केली होती.तो प्रकल्प आता मार्गी लागत आहे. आनंदच आहे. शिंदे फडणवीस सरकारने बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा करावी. गरज आहे. पहा जमतंय का.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध उद्योजकांची, नेतेमंडळीची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही योगींची भेट घेतली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी युपीतील महाराष्ट्र भवनाबाबत आठवण करून दिली. तेव्हा त्यांनी महाराष्ट्र भवनाच्या उभारणीसाठी तत्वतः मंजुरी दिली असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. म्हणूनच, संजय राऊतांनी शिंदेवर निशाणा साधला.

हेही वाचा – दोन दिवसांत तब्बल ५ लाख कोटींची गुंतवणूक; योगींचा मुंबई दौरा यशस्वी