घरताज्या घडामोडीघरचे दरवाजे उघडे, का उगाच वणवण भटकताय? बंडखोर आमदारांना संजय राऊतांची आर्त...

घरचे दरवाजे उघडे, का उगाच वणवण भटकताय? बंडखोर आमदारांना संजय राऊतांची आर्त हाक

Subscribe

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेनेतील नेते यांची पक्षात गुरफट होत असल्याचंही अनेकांनी मान्य केलंय. त्यामुळे आता शिवसेनेत दोन गट पडले असून उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते राहिले आहेत, तर पक्षातील नेते शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुवाहटीला गेलेल्या आमदारांना संजय राऊतांनी आर्त हाक दिली आहे. (Sanjay Raut tweet on MLA’s)

हेही वाचा – ज्यांनी आमदार केलं त्यांच्याशी गद्दारी नाहीच, सूरत सुटकेची कैलास पाटलांनी सांगितली आपबिती

- Advertisement -

चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र! असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यास तयार असून, मुंबईत येऊन चर्चा करा, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी सांगितलं होतं. पुढच्या 24 तासांत मुंबईत या, असं संजय राऊतांनी शिंदेंबरोबर गेलेल्या बंडखोर आमदारांना उद्देशून सांगितलं होतं.

- Advertisement -

आणखी वाचा

विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या तावडीतून सुटून आलेल्या दोन आमदारांवरची आपबितीही आज सांगितली आहे. कैलास पाटील आणि देशमुख यांची कहाणी थरारक आहे. त्यांचं अपहरण करून भाजपने त्यांना नेलं, त्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यांच्या ताब्यातील 21 आमदारांचा संपर्क आमच्याशी झालाय. तुम्ही कितीही फोटो, व्हिडिओ पाठवले तरी ज्यादिवशी ते मुंबईत येतील त्यातील 21 आमदार शिवसेनेबरोबर असतील, त्यांच्याशी ठाकरेंची चर्चा झाली आहे. विधानसभेतही महाविकास आघाडीचा विजय होईल, एवढा आकडा आमच्याकडे आहे, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.

हेही वाचा 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -