रुकने वाला वजह ढुंढता हैं, और…, बंडखोर आमदारांसाठी राऊतांचं ट्विट

एकनाथ शिंदेंसह शिवेसनेतील ४० आमदारांनी बंड पुकारल्यापासून संजय राऊत त्यांच्यावर रोज निशाणा साधत आहेत. आज त्यांनी ट्विट करून बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडलं.

एकनाथ शिंदेंसह शिवेसनेतील ४० आमदारांनी बंड पुकारल्यापासून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) त्यांच्यावर रोज निशाणा साधत आहेत. आज त्यांनी ट्विट करून बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडलं. रुकने वाला वजह ढूंडता हैं.. और जाने वाले बहाने… असं म्हणत राऊतांनी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत बंडखोर आमदारांना टोला लगावला. (Sanjay Raut tweet Rebel mla)

हेही वाचा – आम्ही केलेलं बंड नव्हे, तर अन्यायाविरोधात उठाव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदेसह अनेक आमदार बंड करून सुरतला गेले होते. सुरतेला पोहोचवल्यावर त्यांच्या बंडाची पहिली ठिणगी पडली. तेथून त्यांनी महाविकास आघाडीसोबत फारकत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची मागणी केली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत पायउतार होण्याचं ठरवलं. अखेर एकनाथ शिंदे आणि भाजपने सत्ता स्थापन करून बहुमताची चाचणीही पार केली.

दरम्यान, या काळात अनेक आमदार हळूहळू शिंदे गटात सामिल होत होते. रविवारपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आमदार संतोष बांगर यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. तसेच, काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय कार्यकारिणीत हजेरी लावलेले उदय सामतंही लागलीच दुसऱ्या दिवशी शिंदे गटात सामिल झाले. आतापर्यंत शिंदे गटात सेनेचे ४० आमदार आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी वरील ट्विट केले आहे.

हेही वाचा– आम्ही केलेलं बंड नव्हे, तर अन्यायाविरोधात उठाव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दरम्यान, आम्ही बंड केले नसून उठाव केला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अधिवेशनाच्या भाषणात म्हटलं. आम्ही बहुमताचा विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी येथे आलो आहोत. त्यांच्या स्मारकावर अभिवादन आम्ही केलं आहे. हे सरकार बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आलेलं आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार या राज्याला पुढे घेऊन जाणार आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आणि शिवसेना-भाजप युतीचे सरकार आज स्थापन झालेलं आहे. या राज्यामध्ये सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहोत. शेतकरी, कामगार आणि कष्टकरी, समाजातील सर्व घटक असतील, या सर्वांना हे सरकार न्याय देईल, असंही एकनाथ शिंदे प्रसार माध्यमांसमोर म्हणाले.