घरमहाराष्ट्रSanjay Raut : मुख्यमंत्र्यांबद्दल राऊतांचे अपशब्द; 'राज्य XXच्या हातात आहे, त्यामुळे गुंड...

Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांबद्दल राऊतांचे अपशब्द; ‘राज्य XXच्या हातात आहे, त्यामुळे गुंड फोफावले’

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारबाबत बोलताना खालच्या पातळीवर टीका केली आहे. "राज्यात XXचे सरकार आहे, त्यामुळे गुंड फोफावले आहेत" अशा अपशब्दांचा वापर राऊतांकडून करण्यात आला आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी (ता. 08 फेब्रुवारी) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्याभरात राजकीय क्षेत्रात तीन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर याच प्रकरणावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारबाबत बोलताना खालच्या पातळीवर टीका केली आहे. “राज्यात XXचे सरकार आहे, त्यामुळे गुंड फोफावले आहेत” अशा अपशब्दांचा वापर राऊतांकडून करण्यात आला आहे. (Sanjay Raut used abusive words while criticizing the state government)

हेही वाचा… Mahendra More Death : भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र मोरेंचा मृत्यू, तीन दिवसाआधी झाला होता गोळीबार

- Advertisement -

आजच्या (ता. 10 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यात ही जी गुंडगिरी सुरू आहे ती भाजपाच्या आशिर्वादाने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने सुरू आहे. हे राज्य इतके बदनाम कधीच झाले नव्हते. आज सुद्धा मुख्यमंत्र्यांचा एका गुंडासोबतचा फोटो मी पोस्ट केला आहे. जन्मठेप, हत्या, खून यांसारखे गुन्हे त्या गुंडावर आहेत. गृहमंत्र्यांना हे दिसत नाही का? गृहमंत्र्यांनीच खरे तर मुख्यमंत्र्यांवर एफआरआय दाखल केला पाहिजे. गुंडांच्या साथीने हे राज्य चालवण्यात येत आहे. पण गृहमंत्री काय करत आहेत? असा प्रश्न राऊतांकडून यावेळी उपस्थित करण्यात आला.

तर, मुख्यमंत्र्यांचे गुंडांसोबत जे दररोज फोटो येत आहेत, त्यांचे गुंडांसोबत असलेल्या लागेबांध्याबाबत चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. यासाठीचे पुरावे आम्ही देतो. कारण गृहमंत्र्यांकडे पुरावे आहेत, पण ते त्यांनी कुठे टाकले ते माहीत नाही. पण आमच्याकडील चार फाईल्समध्ये असलेले पूरावे आम्ही पाठवल्यावर ते महाराष्ट्रावर भारी पडेल, असा इशाराच संजय राऊतांनी दिला आहे.

- Advertisement -

बिहार हे सुसंस्कृत असून कायदा आणि सुव्यवस्थेच्याबाबतही चांगले आहे. पण महाराष्ट्र हे त्यापेक्षाही पुढे गेले आहे. महाराष्ट्र गुन्हेगारीच्याबाबतीत बिहारच्या पुढे गेला आहे. उद्योग, कृषी, विकास याबाबतीत महाराष्ट्र मागे पडला आहे. मात्र गुंडगिरी, झुंडगिरी आणि माफियागिरीच्याबाबत महाराष्ट्र पुढे चालला आहे. कारण या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे गुंडांना पाठिशी घालत आहेत, असा आरोप राऊतांकडून केला. राज्य सध्या गां#X% लोकांच्या हातात आहे. त्यामुळे गुंड फोफावले आहेत. गुंडगिरीचे राज्य गुंड चालवत आहेत, असे म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -