घरताज्या घडामोडीआमच्या श्रद्धास्थानाकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर शिवसैनिक खवळून उठतील, राऊतांचा इशारा

आमच्या श्रद्धास्थानाकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर शिवसैनिक खवळून उठतील, राऊतांचा इशारा

Subscribe

शिवसैनिकांच्या आंगावर जर कोणी याल खासकरुन शिवसेना भवनावर तर आम्ही गुंड आहोत.

शिवसेने गुंडगिरी करते परंतु सत्तेचा माज म्हणाल तर ते चुकीचं असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपच्या फटकार मोर्चात जर सत्तेचा माज दाखवला असता तर वेगळ्या पद्धतीचा राडा झाला असता. गुंडगीरी म्हणाल तर शिवसैनिकांच्या आंगावर जर कोणी याल खासकरुन शिवसेना भवनावर तर आम्ही गुंड आहोत. शिवसेना भवन राज्याच्या अस्मितेचं प्रतिक आहे. मराठी माणसाचं योगदान त्या वास्तुमधी आहे. बाळासाहेब ठाकरे स्वतः त्या वास्तुमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करत होते त्या वास्तुच्या दिशेने कोणी चाल करत असेल तर आम्ही गुंड आहोत असे राऊत यांनी म्हटलं आहे.

मराठी माणसाच्या बाबतीत आम्ही गुंड

आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टीफाईड गुंड आहोत महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत आम्ही गुंड आहोत. त्यावेळी गुंडगीरी केली म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आवाज आहे तो आवाज दाबण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही गुंडगीरी दाखवू असा इशाराच राऊतांनी दिला आहे.

- Advertisement -

वाकड्या नजरेनं पाहाल तर…

विरोधी पक्षाचा आवाज बुलंद असला पाहिजे या मताचा आहेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या मताचे आहेत. आंदोलन करत असताना आमची जी श्रद्धास्थानं आहेत. अस्मितेच्या खुणा आहेत. त्याच्याकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर सहन होणार नाही महाराष्ट्र खवळून उठेल, शिवसेनाभवनासमोर आंदोलन करायचं नाही शिवसेना भवन हे अपवाद आहे.

राज्यपालांनी महाराष्ट्राला भेट द्यावी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजकारणातला, संसदेतला, प्रशासनातला अनुभव पाहिला तर या क्षणी ते राज्याचे वडिलधारे आहेत. त्यांना शुभेच्छा देणं हे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन शुभेच्छा दिल्या राज्यातील मंत्री शुभेच्छा देण्यासाठी जात आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला आदर असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज्यपाल केंद्राचे दुत आहेत केंद्राच्या आदेशानुसार ते वागत असतील तरी राज्यातील घटनात्मक पद्धतीने त्यांना वागाव लागतं असेही राऊत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

वाढदिवसाला प्रत्येकवेळी शुभेच्छा देणाऱ्यानेच भेट आणि पुष्पगुच्छ द्यायाचा असं नाही, १२ आमदारांच्या नियुक्तीचा मंजुरीचा पुष्पगुच्छ राज्यपालांनी महाराष्ट्राला द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. गेल्या ७ महिन्यापासून आम्ही वाट बघत आहोत. आता गोडीगुलाबीचे वातावरण पाहता लवकरच राज्यपाल निर्णय घेतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -