महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या करावाईचा ससेमीरा सुरुच आहे. शिवेसना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांवर ईडी कारवाई करत आहेत. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचारांचे आरोप करत तपास यंत्रणांना पुरावे दिले आहेत. तसेच किरीट सोमय्या खोटे आरोप करत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलावर भ्रष्टाचार आणि अवैध बांधकाम केले असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली असून बाप-बेटे जेलमध्ये जाणारच असे पुन्हा सूचक ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा पर्दाफाश करणार असल्याचेही राऊत म्हणाले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपला सूचक इशारा दिला आहे. भाजप आणि केंद्र सरकार राजकीय सूडभावनेने विरोधकांवर कारवाई करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांची बदनामी करण्यासाठी हा प्रयत्न सुरु असून भाजपच्या नेत्यांवर कारवाई का होत नाही? असा सवालसुद्धा संजय राऊतांनी केला आहे. दरम्यान किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना तुरुंगात जावे लागणार असे संजय राऊत म्हणाले होते. तसेच त्यांच्याविरोधातील पुरावे तपास यंत्रणांना देणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. त्यानुसार राऊतांनी पुरावे सादर केले आहेत. तसेच आता बाप-बेटे जेलमध्ये जाणारच असे राऊत पुन्हा म्हणाले आहेत. किरीट सोमय्यांवर सध्या कोणत्या यंत्रणेकडून कारवाई करण्यात आली नाही परंतु राऊतांच्या ट्विटमुळे लवकरच कारवाई सुरु होण्याची शक्यता आहे.
खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, माझे शब्द अधोरेखित करा, पुन्हा सांगतो, बाप- बेटा जेलमध्ये जाणार असे म्हणत संजय राऊतांनी कालावधी म्हटलं आहे. त्यांच्याव्यतिरिक्त ३ केंद्रीय तपास यंत्रणांतील अधिकारी आणि त्यांचे वसुली एजंटसुद्धा लवकरच तुरुंगात जातील, महाराष्ट्र झुकणार नाही अशा आशयाचे ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
Mark my words…
I repeat :
“Bap Beta jail jayenge”. Period.And rest assured, apart from Baap & Beta, 3 Central agency officials and their “Vasuli Agents” will also go behind bars.
Maharashtra Jhukega nahi ! pic.twitter.com/4SCyOY4Pna
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 2, 2022
हेही वाचा : किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्यांना पहिला दणका