Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र "2024ला आमची सत्ता आल्यावर तपास यंत्रणांना...", संजय राऊतांचा इशारा

“2024ला आमची सत्ता आल्यावर तपास यंत्रणांना…”, संजय राऊतांचा इशारा

Subscribe

देशातील सर्वच तपास यंत्रणांचा सरकारकडून गैरवापर केला जात आहे, अशी टीका सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आज (ता. 11 ऑगस्ट) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राऊत यांनी तपास यंत्रणांना थेट इशाराच दिला आहे.

मुंबई : देशातील सर्वच तपास यंत्रणांचा सरकारकडून गैरवापर केला जात आहे, अशी टीका सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. तपास यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून विरोधकांवर दबाव आणला जात आहे. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, याशिवाय अनेक आरोप विरोधकांकडून करण्यात आले आहेत. यांत सर्वाधिक आरोप हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहेत. त्यामुळे आज (ता. 11 ऑगस्ट) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राऊत यांनी तपास यंत्रणांना थेट इशाराच दिला आहे. (Sanjay Raut warning to the investigation agencies)

हेही वाचा – “नाही तर जेवणावेळी…”, राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांच्या भोजन कार्यक्रमावर टीका

- Advertisement -

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, येत्या 2024 मध्ये देशात आणि महाराष्ट्रात सत्ता बदल होणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि दिल्लीत INDIA आघाडीचे सरकार येणार आहे. तेव्हा तुम्ही कुठे जाल? आज तपास यंत्रणेच्या माध्यमातून आमचा छळ सुरू आहे. माझे या महाराष्ट्रातील तपास यंत्रणा आणि पोलीस यंत्रणांनाही सांगणे आहे. 2024 ला प्रत्येक खोट्या केसेस, गुन्हे, तपास, दहशत याचे उत्तर त्या सर्वांना द्यावे लागणार आहे. 2024मध्ये यंत्रणांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल, इंडिया आघाडीत त्यावर एकमत आहे. यावेळी कुणालाही दयामाया नाही. सरकार बदलणार आहे, असा इशारा राऊतांकडून देण्यात आला आहे.

यावेळी राऊतांनी मोदींना फ्लाइंग किसच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा टोला लगावला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक प्रमुख नेत्यांच्या मिसेसचे फ्लाइंग किस पाहिलेले आहेत, असे सांगत राऊत म्हणाले, याचे व्हिडीओ मी तुम्हाला दाखवू शकतो. राहुल गांधींनी फ्लाइंग किस केले म्हणजे काय केले. त्यांनी कोणाचा विनयभंग केला का? त्यांनी संपूर्ण संसदेत अत्यंत प्रमाने आपल्या भावना व्यक्त केल्या. हे नव्या पिढीचे साधन आहे प्रेम व्यक्त करण्याचे. तुम्ही माझा द्वेष करा पण मी तुमच्यावर प्रेम करेल. राहुल गांधींनी मोहब्बतची दुकान उघडली आहे. त्यातील ज्या वस्तू आहेत त्यापैकी फ्लाईंग किस एक आहे. तुम्हीही फ्लाईंग किस द्या देशातील जनतेला. मणिपूरला जाऊन फ्लाईंग किस द्या. तुम्हाला कोणी रोखले?, असा उलट प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. तर राहुल गांधींच्या रुपात काँग्रेसने मोठे आव्हान उभे केले आहे, त्यामुळे त्यांच्या डोक्यातून काँग्रेस जात नाहीये, असा टोला देखील राऊतांनी लगावला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -