घरमहाराष्ट्रराणेंनी त्यांच्या खात्याचा विकास करावा, उगाच शहाणपणा कराल तर..; राऊतांचा इशारा

राणेंनी त्यांच्या खात्याचा विकास करावा, उगाच शहाणपणा कराल तर..; राऊतांचा इशारा

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खातं देण्यात आलं आहे. त्या खात्याचं काम करण्यासाठी तुम्हाला मंत्री नेमलं आहे. त्या खात्याचा विकास करा. उगाच बडबड करु नका. शहाणपणा कराल, आमच्या अंगावर याल तर ही शिवसेनाच आहे, असा इशारा राऊत यांनी दिला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

“आम्ही टीकेचं स्वागत करतो आणि विधायक स्वरुपात घेतो. टीका बाळासाहेब ठाकरेंवर देखील होत होती. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की राजकारणात दोन घ्यायच्या असतात आणि दोन द्यायच्या असतात. ज्या भाषेत टीका व्हायची ती टीका सगळ्यांनी स्वीकारली आहे. पण आता जी होतेय त्याला टीका म्हणत नाही त्याला गटारात तोंड बूडवून थूंकणं म्हणतात. पण तुमचंच तोंड खराब होत आहे, हे लक्षात घ्या,” असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

“महाराष्ट्राची परंपरा आहे. साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक…आपण जेव्हा फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, शाहूंचा महाराष्ट्र म्हणतो, छत्रपति शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो…तेव्हा या महाराष्ट्राची परंपरा समजून घेतली पाहिजे. महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही म्हणजे काय? पश्चिम बंगालमध्ये तुमचा पराभव झाला, हे लक्षात घ्या. पश्चिम बंगालमधून तुम्हाला पळून जावं लागलं. महाराष्ट्रातून देखील तुम्हाला नामशेष केलं जाईल, अशी भाषा वापरात असाल तर! पश्मिम बंगाल देशाचा भाग आहे. क्रातीकारकांची भूमी आहे. लाल-बाल-पाल हा त्रिशूल जो आहे त्यातील एक टोक बंगालचं आहे हे लक्षात घ्या, त्याच त्रिशुलाचं टोक तुमच्यात घुसलं आहे. एखाद्या राज्याचा अपमान कराल तर देश तुम्हाला माफ करणार नाही,” असं राऊत म्हणाले.

तुम्ही एक केंद्रीय मंत्री आहात, तुम्ही देश समजून घ्या मग तुम्ही राजकाराणावर बोला. तुम्ही केंद्रीय मंत्री आहात ते तुमच्या खात्याचं काम करायला तुम्हाला मंत्रिपद देण्यात आलं आहे. इथे येऊन बकाल करायला तुमचं खातं नाही आहे. तुम्ही तुमचं खात मजबूत करा, देशाला दिशा द्या, रोजगार द्या, आम्ही तुमचं स्वागत करु. इथे येऊन बकवास करु नका हे मी आता सांगतोय…आणि शहाणपणा कराल, आमच्या अंगावर याल तर एक लक्षात घ्या ही शिवसेनाच आहे, असा इशारा देत राऊत यांनी तुम्ही किंवा तुमच्या पोरांच्या बडबडण्याने काही होत नाही, असं ठणकावलं.

- Advertisement -

हेही वाचा – सहा वर्षांनी थप्पड ऐकायला आली का? आदित्यनाथांबद्दलच्या वक्तव्यावर राऊतांचा सवाल


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -