घरमहाराष्ट्रमातोश्रीच्या नादाला लागाल तर गोवऱ्या स्मशानात रचून या; राऊतांचा धमकीवजा इशारा

मातोश्रीच्या नादाला लागाल तर गोवऱ्या स्मशानात रचून या; राऊतांचा धमकीवजा इशारा

Subscribe

शिवसेना कुठे आहे ते विचारत होते. त्यांना शिवसेना मुंबईत दिसते, महाराष्ट्रात दिसतेय, नागपुरात दिसतेय. शिवसेनेच रक्त काय आहे, हे दिसलं. या पुढे मातोश्रीच्या नादाला कोणी लागलं, जर कोणी यापुढे शिवसेनेच्या नादाला लागलं तर त्यांनी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून याव्यात, असा धमकीवजा इशारा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी राणा दाम्पत्य आणि भाजपला दिला. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

लोकसभेत पुन्हा निवडून जाऊन दाखवा असं आव्हान संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांना दिलं. अमरावतीला मी जाणार आहे, आम्ही सगळे जाऊ, पाहतो अमरावती शिवसेनेचा आहे की कोणाचा, असं राऊत म्हणाले. शिवसेनेचं हिंदुत्व या घंटाधारी लोकांचं नाही. शिवसेनेचं हिंदुत्व हे गदाधारी आहे. आम्हाला हिंदुत्व शिकवण्याचं अतिशहाणपणा करु नका. कृपा करुन शिवसेनेच्या वाट्याला जावू नका. मातोश्रीची छेडछाड करु नका, २० फूट खाली गाडले जाल, हे मी कॅमेऱ्यासमोर सांगतोय, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका. आज जी तुमच्या विषाला उकळी फुटली असेल तर तीला तिथल्या तिथे दाबण्याची ताकद आजही शिवेसेनेमध्ये आहे. आम्हाला वारंवार धमक्या देऊ नका, मी सुद्धा नागपुरातच आहे. उद्धव ठाकरेंनी मला नागपुरातच राहायला सांगितलं आहे. धमक्या देऊ नका, असा इशारा संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

- Advertisement -

“आपण पाहताय की गेल्या दोन दिवसांपासून काही घंटाधारी हिंदुत्ववादी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईत येऊन, मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा वाचणार. मातोश्रीत घुसून हनुमान चालीसा वाचणार अशा प्रकारची भाषा नुसती वापारली नाही, तर अगदी जणू काही महान योद्धे आहोत, सत्यवादी आहोत, अशाप्रकारचा आव आणून अमरावतीचे बंटी बबली मुंबई आले. त्यांनी थोडा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींचा दौरा आहे, त्या दौऱ्याला गालबोट लागू नये यासबबी खाली त्यांनी पळ काढला. आंदोलन मागे घेतलं म्हणजे पळ काढला. पंतप्रधानयांचा दौरा आहे याची जबाबदारी महाराष्ट्राची आहेत, ते पंतप्रधान आमचेही आहेत, ते एकाच पक्षाचे नाहीत. त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागून नये, असं महाराष्ट्राला, शिवसेनेला वाटणार नाही. जर कोणी गालबोट लावत असेल. तर तिथे सरकार काय…शिवसेना तिथे ठाणपणे उभी राहिल पंतप्रधान यांचं संरक्षण करण्यासाठी. बंटी आणि बबली यांचा गालोबट लागेल म्हणून माघार घेत आहोत हा दावा फोल आहे. हजारोच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर आले आहेत. शिवसैनिकांनी रुग्णवाहिका देखील ठेवल्या होत्या. आमचे शिवसैनिक किती काळजी घेतात बघा
चार रुग्णवाहिका आमच्या शिवसैनिकांनी तयार ठेवल्या होत्या,” असं राऊत म्हणाले.

“पूर्णपणे हे भंपक बोगस लोकं, हिंदुत्वाच्या नावाखाली यांच्या खांद्यावर भाजपचे प्रमुख लोक बंदूक ठेवून शिवसेनेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. काल आणि आज यांना मातोश्रीवर घुसून काही वेगळं करण्याचं कारस्थान रचलं होतं. हनुमान चालीसा वाचायची असेल तर घरी वाचा, मंदिरात वाचा. मातोश्रीची निवड करुन महाराष्ट्रामध्ये गोंधळ, दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करण हे कोणाचं कारस्थान आहे. या बाईंचं हिंदुत्वाशी संबंध काय आहे? श्रीरामाचं नाव घेण्यास या बंटी बबलीचा विरोध होता. राम अयोध्या आंदोलनाला याचा विरोध होता. हिंदुत्व शब्द घ्यायला लाज वाटत होती. या खासदार बाईंना सुरक्षा दिली. का दिली हे खासगीत सांगू. जातीचं बोगस प्रमाणपत्र वापरून लोकसभेची निवडणूक लढते, ज्या बोगस प्रमाणपत्राला उच्च न्यायालयाने शिक्का मारला आहे, बोगस असल्याचं न्यायालयाने म्हटल. बोगस खासदाराने आम्हाला नितीमत्ता शिकवू नये,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

- Advertisement -

कायदा, घटना राज्याच्या राज्यपालांना शिकवा

“राष्ट्रपती राजवट कधी लावली जाते…का लावली जाते…कोणत्या परिस्थितीत लावली जाते आणि कोणत्या परिस्थितीत काढली जाते…सकाळी ४ वाजता राजभवन उघडून शपथ घेऊन मग राष्ट्रपती राजवट उठवणारे कारस्थानी लोकं या महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यामुळे राजष्ट्रपती राजवटीच्या घटनात्मक तरतुदी शिवसेनेला सांगू नये. आम्हाला कायदा कळतो, घटना कळते. कायदा आणि घटना जर कोणाला शिकवायची असेल तर या राज्याच्या राज्यपालांना शिकवा. अनेक घटनात्मक फाईलींवर अडीच वर्ष बसून आहेत,” अशी टीका राऊतांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर देखील केली.

तर त्यांचा लक्ष्यभेद केला जाईल

“मातोश्रीची रेकी करण्याचा प्रयत्न झाला. शिवसैनिक संतापले आणि चाल करुन गेले. तेव्हा तो कायदा सुव्यस्थेचा प्रश्न नसून आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. यापुढे जर असा प्रसंग परत आला तर आम्ही पुन्हा पुन्हा चाल करुन जाऊ हे लक्षात घ्या. सत्ता असेल नसेल आम्हाला फरक नाही. सत्तेसाठी तुमचा जीव तडफडतोय, आमचा नाही. तुम्ही गटांगळ्या खात आहात आम्ही नाही, या महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायचं, गोंधळ निर्माण करायचं. स्वत:चं हिंमत नाही म्हणून शिखंडींना पुढेकरुन आमच्यावर हल्ले करायचे. हे जर असं चालत राहिलं तर त्यांचा लक्ष्यभेद केला जाईल. महाभारत नव्याने घडवण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुढे देखील आम्हीच सत्तेत असू हे गोंधळ घालणाऱ्यांनी लक्षात घ्यावं, असं राऊत यांनी भाजपला ठणकावून सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -