Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी औरंगजेबच्या कबरीपुढे गुडघे टेकवणाऱ्या ओवैसींना त्याच मातीत गाडू, संजय राऊतांचा ओवैसी बंधूंना...

औरंगजेबच्या कबरीपुढे गुडघे टेकवणाऱ्या ओवैसींना त्याच मातीत गाडू, संजय राऊतांचा ओवैसी बंधूंना इशारा

Subscribe

औरंगाबादमध्ये एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी सभा घेतली होती. सभेपूर्वी त्यांनी औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतलं आहे. यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ओवैसी बंधूंवर निशाणा साधला आहे. औरंगजेबाला मराठ्यांनी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडले आहे. तुम्ही जर आम्हाला आव्हान देणार असाल तर आम्ही तुमचे आव्हान स्वीकारुन त्याच मातीमध्ये गाडू असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना ओवैसी बंधूंवर निशाणा साधला आहे. औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेणे हे रितीरिवाज नाही आहेत. वारंवार यायचं संभाजीनगरला आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे आम्हाला आणि महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे यातून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची असा या ओवैसी बंधूचे राजकारण दिसत आहे. परंतु इतकेच सांगेल त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांनी बांधली आहे. त्याला कबरीमध्ये आम्ही टाकले आहे. तुम्ही आज कबरीवर येऊन नमाज पढताय कधीतरी त्याच कबरीमध्ये तुम्हाला जावं लागेल असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

- Advertisement -

औरंगजेब संत नव्हता. त्याने महाराष्ट्रावर आक्रमण केले आणि महाराष्ट्रातील मंदिर प्रार्थना स्थळे उद्धवस्त केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर २५ वर्ष मराठा योद्ध्यांनी लढाई लढली आहे. त्याच महाराष्ट्रात तुम्ही येऊन कबरीचे दर्शन घेऊन प्रार्थना कराल तर हे महाराष्ट्राला आव्हान देण्यासारखे झाले आहे. आम्ही आव्हान स्वीकारले असल्याचे समजा, औरंगजेबला याच मातीत जावे लागले होते. त्यांच्या भक्तांनासुद्धा याच मातीत जावे लागेल. महाराष्ट्राची माती मर्दांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माती आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत.

अकबरूद्दीन औवेसींनी घेतलं औरंगजेबच्या कबरीचे दर्शन

एमआयएमचे खासदार अकबरूद्दीन औवेसी औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि वारिस पठाण उपस्थित होते. एका कबरीचे दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या कबरीकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. त्यामुळे आम्ही सर्वच कबरींचे दर्शन घेतले, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी दिली आहे.


- Advertisement -

हेही वाचा : ज्यांना घरातून बाहेर काढले, त्यांच्यावर मी काय बोलू? ; अकबरुद्दीन ओवेसींची राज ठाकरेंवर टीका

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -