घरमहाराष्ट्रSanjay Raut : हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण आहेत? संजय राऊतांकडून...

Sanjay Raut : हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण आहेत? संजय राऊतांकडून आणखी एक फोटो ट्वीट

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे गुंडांशी कनेक्शन असून त्यांना पक्षात प्रवेश दिला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर करत, ‘हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण आहेत?’ असा प्रश्न त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : निवडणूक आयोग ‘सुपारीबाज संस्था’,राऊतांची घणाघाती टीका

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांनी आपल्या सोशल अकाऊंटच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात मोहीमच उघडली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दररोज एक फोटो शेअर करत संजय राऊत हे या पिता-पुत्राचा गुंडांशी कनेक्शन असल्याचा आरोप करत आहेत. संजय राऊत यांनी सोमवारी खासदार श्रीकांत शिंदे आणि कुख्यात गुंड हेमंत दाभेकरसोबतचा फोटो तर, मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गुंड निलेश घायवळचा फोटो ट्वीट केला आहे.

- Advertisement -

खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला कुख्यात गुंड हेमंत दाभेकर आला होता. त्याच्यासोबतचा फोटो X या सोशल मीडिया हँडलवर शेअर करत, या गुंडाची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. राज्यातील वाढत्या गुंडगिरीसाठी त्यांनी राज्य सरकारला जबाबदार धरले.

हेही वाचा – Sanjay Raut : “भ्रष्टाचार करा, पक्ष फोडा, हीच मोदी गॅरंटी…”, राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी, मुख्यमंत्री शिंदे तसेच त्यांचे समर्थक आमदार संतोष बांगर आणि गुंड निलेश घायवळचा फोटो संजय राऊत यांनी सोशल मीडियावर ट्वीट केला. निलेश घायवळवर पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे 14पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. हा फोटो शेअर करताना, ‘महाराष्ट्रात गुंडा राज : गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य,’ अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.

तर आज बुधवारी, त्यांनी आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुंड जितेंद्र जंगम दिसत आहे. ‘काही गुंड टोळ्या आणि त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत थेट मिंधे गँगमध्ये प्रवेश करीत आहेत. हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण आहेत?’ असा प्रश्न त्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -