तब्बल 9 तासांनंतर संपली वर्षा राऊत यांची ईडी चौकशी

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची पत्राचाळ जमीन घोटाळा घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची चौकशी संपली आहे. तब्बल नऊ तास वर्षा राऊत यांची चौकशी सुरू होती.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची पत्राचाळ जमीन घोटाळा घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची चौकशी संपली आहे. तब्बल नऊ तास वर्षा राऊत यांची चौकशी सुरू होती. मुंबईतील ईडी कार्यालयात या दोघांची चौकशी झाली आहे. (sanjay raut wife varsha raut ed inquiry conducted for almost nine hours)

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी बातचीत केली. त्यावेळी वर्षा राऊत यांनी ईडीने परत चौकशीला बोलावल्यास हजर राहणार असल्याचे सांगितले. तसेच, “आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, काहीही झाले तरी पक्ष सोडणार नाही”, असेही वर्षा राऊत यांनी म्हटले. त्यामुळे पुन्हा ईडीकडून वर्षा राऊत यांची चौकशी होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने संजय राऊतांच्या घरी छापेमारी केली होती. त्यावेळी ईडीला राऊतांच्या घरातून काही कागदपत्रे मिळाली होती. त्यासंदर्भात वर्षा राऊत यांना प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते. तसेच, प्रवीण राऊत यांच्याशी झालेल्या व्यवहारांची तुम्हाला माहिती होती का? तुमच्या खात्यात अनोळखी व्यक्तीकडून 1 कोटी 8 लाख रुपयांचे व्यवहार झालेत हा अनोळखी व्यक्ती कोण? अलिबागमधील जमीन खरेदी आणि दादरमधील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅट तुमच्या नावे खरेदी करण्यात आला आहे, ही खरेदी प्रक्रिया कशी पार पडली? हे प्रश्न विचारण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, याआधीही म्हजेच जानेवारी महिन्यात वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीसाठी वर्षा राऊत या ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी केली होती.


हेही वाचा – महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी 8 ऐवजी 12 ऑगस्टला होण्याची शक्यता