संजय राऊत किरीट सोमय्यांविरोधात जाणार कोर्टात, कोट्यवधींच्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

Sanjay Raut on Kirit Somaiya | कोल्हापुरात शिरल्यापासून असं वातावरण दिसतंय की या सगळ्या घटनेनंतर आधी होती त्यापेक्षा संघटना मजबूत होऊन विस्तारताना दिसतेय. अजून काही कार्यक्रम आहेत, त्यासंदर्भात चर्चा करू. शिवसैनिकांच्या गर्जनेला बळ देण्याकरता हे दौरे होत आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.

sanjay-raut-reaction-on-today-supreme-court

Sanjay Raut on Kirit Somaiya | कोल्हापूर – भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील युद्ध शमण्याचं नाव घेत नाहीय. आयएनएस विक्रांत (INS Vikrant) घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना कोर्टात खेचण्याचा दावा केला आहे. विक्रांत घोटाळ्याची (INS Vikrant Scam) चौकशी का थांबवली? जनतेचा पैसा कुठे गेला? याबाबत मी स्वतः कोर्टात याचिका दाखल करणार, असं आज संजय राऊत म्हणाले. आज ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

हेही वाचा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी, शिंदे गट बाजू मांडणार

“आयएनएस विक्रांत वाचवण्याकरता किरीट सोमय्या यांनी लाखो-कोट्यवधी रुपये जनतेकडून गोळा केले. हे पैसे जाहीरपणे गोळा केले. हे लाखो कोट्यवधी रुपये राजभवनावर जमा करू, असं सोमय्या म्हणाले होते. हे पैसे कुठे गेले, हे शेवटपर्यंत कोणालाही कळलं नाही? हा इतका मोठा फ्रॉड, चोरी आहे. याविरोधात चौकशी सुरू होती. मात्र, सरकार बदलल्यानंतर या चोरांना क्लिनचीट देण्यात आली. गेल्या सहा महिन्यांत २८ चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम सरकारने राबवला. पण विक्रांत घोटाळा हा कधीच हडपला जाणार नाही. विक्रांत घोटाळा चौकशी का थांबवली? जनतेचा पैसा कुठे गेला? याबाबत मी स्वतः कोर्टात याचिका दाखल करणार,” असं संजय राऊत म्हणाले.

“हे विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे. त्यांनी पदावरून काढलं म्हणून आम्ही पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षानं आणि बाळासाहेब ठाकरेंनी दिली. ती आम्ही पक्षासाठी ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदं गेली तर परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा, असं म्हणत रेडाबळीप्रमाणे हा गोमातेचा बळी आहे? हे पाहावं लागेल. आम्ही गायींना श्रद्धांजली वाहिली. विधिमंडळातही श्रद्धांजली अर्पण करतील. पालघरचं साधु हत्याकांड आणि कणेरी हत्याकांड हे मी एकच मानतो,” असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा – अधिवेशनातील आंदोलनं चमकोगिरीच

“कोल्हापुरात शिरल्यापासून असं वातावरण दिसतंय की या सगळ्या घटनेनंतर आधी होती त्यापेक्षा संघटना मजबूत होऊन विस्तारताना दिसतेय. अजून काही कार्यक्रम आहेत, त्यासंदर्भात चर्चा करू. शिवसैनिकांच्या गर्जनेला बळ देण्याकरता हे दौरे होत आहेत,” असंही संजय राऊत म्हणाले.