Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सदू आणि मधू भेटले असतील; मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे भेटीवर राऊतांचा...

सदू आणि मधू भेटले असतील; मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे भेटीवर राऊतांचा टोला

Subscribe

मुंबईः सदू आणि मधू भेटले असतील. बालभारतीत आम्हाला त्यांचा धडा होता. उद्धव ठाकरे यांची जी विराट सभा झाली, त्यामुळे त्यांच्या भावना उफाळून आल्या असतील म्हणून भेटले असतील, असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर हाणला.

सावरकरांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना दिलेला इशारा म्हणजे मॅच फिक्सिंग आहे, अशी टीका काही पक्ष करत आहे, या प्रश्नावर खासदार राऊत म्हणाले, फिक्सिंग त्यांच काम सुरु आहे. आमच नाही. आता जे राज्यभरात सुरु आहे ना त्याला फिक्सिंगच म्हणतात. आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडतो. सावरकरांविषयी राहुल गांधी यांना इशारा दिलेला नाही. आमची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. सावरकर हा श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे त्यांचा आदर झालाच पाहिजे. मी दिल्लीला जाणार आहे. तेव्हा राहुल गांधी यांना भेटणार आहे आणि सांगणार आहे की सावरकरांचा अपमान करु नका.

- Advertisement -

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कधीच एकत्र येणार नाहीत. मला संसदेत रोज पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा भेटत असतात. सत्ताधारी आणि विरोधकांचा येण्या जाण्याचा एकच रस्ता असतो. तेथे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. याचा अर्थ ते एकत्र येणार असा होत नाही. ते अजिबात एकत्र येणार नाहीत. जर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचा वेगवेगळा रस्ता ते बनवणार असतील ते मला माहीत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धनुष्यबाण यात्रा काढणार आहेत यावर संजय राऊत म्हणाले, तोच धनुष्यबाण त्यांच्या छाताडावर पडणार आहे. सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, आधी त्यांची नार्को टेस्ट करा. गेल्या वर्षी ५० कोटीला कांदा एक विकला गेला ना. अशा फाल्तू लोकांच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. उद्धव ठाकरे यांची मालेगावला सभा झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची उत्तर सभा होणार आहे, यावर संजय राऊत म्हणाले, त्यांना दुसरे काहीच काम नाही. उत्तर, दक्षिण, अग्नेय अशा सर्वच सभा ते घेतील. सभा घेण्यापेक्षा राज्याचा कारभार आधी नीट चालवा.

- Advertisement -

 

- Advertisment -