घरताज्या घडामोडी२०१४ मध्ये युती तुटली तेव्हा हे १२ खासदार कुठे होते? राऊतांचा परखड...

२०१४ मध्ये युती तुटली तेव्हा हे १२ खासदार कुठे होते? राऊतांचा परखड सवाल

Subscribe

२०१४ मध्ये युती तुटली तेव्हा हे १२ खासदार कुठे होते असा परखड सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच, २०१४ आणि २०१९ युती तुटली ती भाजपमुळेच. शिवसेना याला जबाबदार नाही, असंही त्यांनी अधोरेखित केलं

शिवसेनेतील १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला. त्यांनी याबाबत दिल्लीत जाऊन पत्रकार परिषद घेऊन कबुलीही दिली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत आता जास्तच आक्रमक झाले आहेत. २०१४ मध्ये युती तुटली तेव्हा हे १२ खासदार कुठे होते असा परखड सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच, २०१४ आणि २०१९ युती तुटली ती भाजपमुळेच. शिवसेना याला जबाबदार नाही, असंही त्यांनी अधोरेखित केलं. (sanjay raut’s answer for rahul shewales counter question about rebel 12 MP’s of Shivsena)

हेही वाचा – युतीसाठी उद्धव ठाकरे यांची मोदींसोबत एक तास चर्चा, राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, दिल्लीत महाराष्ट्राचे १२ खासदार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत बसले होते. त्यांनी युतीसंदर्भातील काही भाष्य केलं. त्यांना शिवसेनेच्या वतीने एकच प्रश्न विचारायचा आहे. २०१४ ला युती तुटली तेव्हा आपण कुठे होतात? भाजपने युती तोडली तेव्हा यापैकी किती लोकांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्न विचारला?

ते पुढे म्हणाले की, आम्हाला युती हवी होती. आम्ही त्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. पण भाजपने युती तोडली. त्यावेळी किती लोकांनी भाजपसोबत युती का तोडली म्हणून प्रश्न विचारला. किती लोक शिवसेनेच्या बाजूने ठामपणे उभे राहिले, किती लोकांनी हल्ले परवतून लावायला मदत केली. आम्ही सातत्याने पक्षाची भूमिका मांडत होतो. असंही राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – तो मॅटिनी शो आता बंद झालाय, राऊत दखल घेण्यासारखे नाहीत, एकनाथ शिंदेंचा पलटवार

राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यास आम्ही पक्षातच राहू असं हे १२ खासदार म्हणाले होते. मात्र त्यांनी आपला शब्द पाळला नाही, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.

आमच्यावरही दबाव आहे. आम्हालाही प्रलोभनं दाखवली. मात्र, प्रलोभनांवर आम्ही कुत्र्यांसारखी टांग वर करून दाखवतो आणि दबावाला आम्ही झुागरून देतो, अशा शब्दांत संजय राऊतांनी बंडखोरांवर टीका केली. आम्ही पक्षासोबत राहतो ही त्यांची पोटदुखी आहे, असंही ते म्हणाले.

हेही वाचा – शिवसेनेच्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट तयार करून लोकसभाध्यक्षांना पत्र दिलं, एकनाथ शिंदेंची माहिती

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -