घरमहाराष्ट्रसुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवण्याबाबत संजय राऊतांचे मोठे विधान

सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवण्याबाबत संजय राऊतांचे मोठे विधान

Subscribe

मुंबई : “या सर्व अफवा बंद करा. आम्हाला पवार कुटुंबीय आणि बारामतीचे राजकारण देखील माहिती आहे”, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळेंच्या विरूद्ध सुनेत्रा पवार निवडणुक लढण्यासंदर्भात केली आहे. 2024नंतर हे कोणीच संसदेत नसेल, असा विश्वास संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.

लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभे केले जात आहे. यासाठी इंडिया तयार आहे का?, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “मला वाटत नाही की, या सर्व अफवा बंद करा, असे होणार नाही. राजकारण आम्हाला सुद्धा कळते. आम्ही महाराष्ट्रात राजकारण करत आहोत. आम्हाला पवार कुटुंबीय आणि बारामतीचे राजकारण देखील माहिती आहे. हे ज्या कोणी अफवा पसरवित असेल ना. विचार करून या सर्व अफवा पसरव्यात. पण कोणीही निवडणूक लढविली तरी सुप्रिया सुळेंच जिंकणार आहे, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजित पवारांनी बैठक घेतली. तरी देखील काही निष्कर्ष काढता आले नाही, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “अजित पवार हे कोणत्याही मुद्द्यावर निष्कर्ष काढू शकत नाही. त्यांच्या हातात काही नाही.”

- Advertisement -

हेही वाचा – “परदेशात जाण्यापेक्षा दुसऱ्या राज्यात गेलेले उद्योग परत आणा”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

कांद्याचा प्रश्न महाराष्ट्रात, आता दिल्लीत बैठक बोलवता

शेतकरी प्रश्नांसाठी दिल्लीवारी करावी लागणार आहे, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. संबंधित खात्याचे मंत्री ते मुंबईत येऊ गेलेत. या राज्याला कृषीमंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री यांनी काय केले. 100 कोटी किंमतीच्या वरचा कांदा पडून आहे. कांदा व्यापारी, शेतकरी अस्वस्थ आहेत. तुमचे मंत्री आले आणि गेले. आता दिल्लीत बोलविले आहे. प्रश्न महाराष्ट्राचा अमुक मंत्री आले आणि काय सांगता तर दिल्लीत या. धन्य आहोत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘चला, आपण धाब्यावर जाऊ…’ हेरंब कुलकर्णींची कविता शेअर करत सुप्रिया सुळेंची भाजपाला कोपरखळी

मध्य प्रदेशात भाजपचा पराभव होणार

मध्य प्रदेशाच्या निवडणुकीत मोठ मोठ्या नेत्यांना उरवित आहे, यावर संजय राऊत म्हणाले, “त्यांना मोठ-मोठे नेते निवडणुकीत उतरवू द्या. पण भाजप मध्य प्रदेश हारणार आहेत. हे सर्वांना माहिती आहे. यामुळे केंद्रीय मंत्र्यांपासून ते पक्षातील मोठ-मोठ्या नेत्यांना सर्वांच जबरदस्ती निवडणुकीत उभे करत आहेत. मध्य प्रदेश भाजप हारणार आहे.

हेही वाचा – Women’s reservation bill : ठाकरे गटाच्या चार खासदारांना शिंदे गटाकडून नोटीस

लोकसभा निवडणुकीनंतर एकही खासदार संसदेत नसेल

महिला आरक्षणावेळी व्हिप नाकारल्यामुळे ठाकरे गटाला कोंडी पकडणार आहे का?, संजय राऊत म्हणाले, “किरकोळ विषय आहे. ते आम्हाला काय व्हिप बजावणार. 2024नंतर हे कोणीच संसदेत नसणार. पुढच्या लोकसभा निवडणुकीत यांची पाठी कोरी असणार. पाहा यापैकी एकही खासदार संसदेत नसेल. मुख्यमंत्र्यांसह एकही आमदार विधानसभेत नसेल. हे पक्के आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -