Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र "खरी मिरची झोंबायची बाकी आहे..." संजय राऊतांची चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका

“खरी मिरची झोंबायची बाकी आहे…” संजय राऊतांची चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका

Subscribe

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रामधून सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात येत असतो. तर बावनकुळे यांनी सामनात करण्यात येणाऱ्या लिखाणाबाबत इशारा दिल्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा बावनकुळे यांना डिवचण्याचे काम केले आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रामधून सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात येत असतो. “फडणवीस हे ‘मुख्य’चे ‘उप’ झाल्यापासून अस्वस्थ आहेत. एका चांगल्या माणसाच्या झोकांड्या जात आहेत, फडणवीसजी सांभाळा,” असे लिहित सामनामधून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्यात आले. पण सामनामधील या लिखाणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. नियमाच्या बाहेर जाऊन, वृत्तपत्रांना दिलेल्या स्वातंत्र्याच्या बाहेर जाऊन एखादे वृत्तपत्र लिखाण करत असेल तर ते यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा बावनकुळे यांच्याकडून ठाकरे गटाला देण्यात आला आहे. (Sanjay Raut’s criticism of Chandrasekhar Bawankule)

हेही वाचा – बेइमान आम्ही की तुम्ही? युतीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी भाजपवर साधला निशाणा

- Advertisement -

तर, दुसरीकडे बावनकुळे यांनी सामनात करण्यात येणाऱ्या लिखाणाबाबत इशारा दिल्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा बावनकुळे यांना डिवचण्याचे काम केले आहे. अग्रलेखाच्या माध्यमातून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली नाही. आम्ही फक्त त्यांना आरसा दाखवला आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंना एवढ्या मिरच्या झोंबायचे कारण काय? अजून त्यांना खरी मिरची झोंबायची बाकी आहे. त्यासाठी वेळ आहे, थांबा जरा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस हे सद्गृहस्थ आहेत. संस्कारी गृहस्थ आहेत. जुन्या भारतीय जनता पार्टीशी संबंधित म्हणजेच गडकरींनी उल्लेख केलेल्या पक्षाचे नेते आहेत. देवेंद्रजी म्हणाले होते की, आमच्याशी बेइमानी केली म्हणून आम्ही शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि त्यांना आमच्याबरोबर घेऊन आलो. आता आम्ही त्यांना केवळ आरसा दाखवला, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांच्याकडून देण्यात आले आहे.

- Advertisement -

तसेच, 2014 मध्ये आम्ही युती तोडली नाही. भाजपच्या घमंडामुळे ती युती तुटली. एका जागेसाठी तुम्ही शिवसेनेसोबतची 25 वर्षांची युती तोडली आणि 2019 मध्ये अमित शहांसमोर बोलणे झाले होते की 50-50 फॉर्म्युला करणार म्हणून. पण जेव्हा आम्ही एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी दिले त्यावेळी ते मुख्यमंत्री म्हणून चालणार नाही असे सांगत त्यांनीच युती तोडली, असे सांगत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

- Advertisment -