Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र "शिंदे गट दिल्लीत मुजरा करून...", संजय राऊत कडाडले

“शिंदे गट दिल्लीत मुजरा करून…”, संजय राऊत कडाडले

Subscribe

शिंदे गट दिल्लीत जाऊन मुजरा करत गुलामी करतंय, असा हल्लाबोल राऊतांकडून करण्यात आला आहे. तसेच, तुमची शिवसेना असली आहे तर झुकता कशाला? असा प्रश्नही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा झाल्याचे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पण यामुळे आता ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. तर शिंदे गट दिल्लीत जाऊन मुजरा करत गुलामी करतंय, असा हल्लाबोल राऊतांकडून करण्यात आला आहे. तसेच, तुमची शिवसेना असली आहे तर झुकता कशाला? असा प्रश्नही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

हेही वाचा – Odisha Train Accident : संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल, म्हणाले; “सीबीआय चौकशी म्हणजे…”

- Advertisement -

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, हिंमत असेल तर तुमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करायचं तर इथे बसून करा. एक वर्ष झालं विस्तार होत नाही याचा अर्थ सरकार जात आहे. म्हणून ते सरकारचा विस्तार करत नाहीत. आम्हाला विस्तार करायचा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे कधी अर्ज घेऊन दिल्लीत उभे राहिले नाही. फडणवीस दिल्लीत गेले किंवा इतर कुणी गेले तर समजू शकतो. त्यांचा मक्का मदिना दिल्लीत आहे. तुमचं काय आहे? तुम्ही दिल्लीत का धावता? फारच विचित्र प्रकार आहे? आमचे विस्तार आम्ही करायचो. हे महाराष्ट्र आहे. हे ऊठसूठ दिल्लीत जात आहेत. ही कसली शिवसेना? ही मांडलिक शिवसेना. हे मांडलिकत्व आहे. ही लाचारी आहे, असा घणाघात राऊतांनी केला.

शिंदे गटाच्या खासदारांना मंत्रीपद मिळणार आहे, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत राऊत म्हणाले की, मला त्याबाबत माहीत नाही. पण त्यांना पंतप्रधानपद मिळावं ही अपेक्षा आहे. त्यांनी प्रचंड क्रांतीकारक काम केलं आहे. उपपंतप्रधानपद, गृहमंत्रीदप, दोन चार राज्यपाल पदे त्यांना द्यायला काही हरकत नाही. कारण त्यांचे कार्य इतके मोठे आहे. त्यांच्या काही लोकांना अमेरिकेत हायकमिश्नर करा. मी नाव देतो. कोण कोण हुशार लोक आहेत त्यांची नावे देतो. एवढं क्रांतीकारी काम केलं आहे. फक्त दोन चार मंत्रिपद काय देता? असा मिश्कील टीका त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिका निवडणुका या एकत्र लढविण्यासाठी ठाकरे गटासोबत चर्चा करणार असल्याचे काल रविवारी (ता. 04 जून) राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले. त्यांच्या या प्रतिक्रियेवर उत्तर देत संजय राऊत म्हणाले की, अजितदादा असतील किंवा काँग्रेस नेते असतील सर्वांची एकच भावना आहे, पालिका, विधानसभा आणि लोकसभेत एकत्र लढायचं हा आमचा सूर आहे. ही आमची वज्रमूठ आहे. त्यामुळे अजित पवार जे सांगत आहेत. ते बरोबर आहे. एकत्र बसून निर्णय घेऊ.

- Advertisment -